For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पनामाच्या राष्ट्रीय प्रतीक गोल्डन फ्रॉगचे होतेय संरक्षण

06:11 AM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
पनामाच्या राष्ट्रीय प्रतीक गोल्डन फ्रॉगचे होतेय संरक्षण
Advertisement

2009 मध्ये लुप्त झाली होती प्रजाती :

Advertisement

पनामाचा गोल्डन फ्रॉग म्हणजेच सोनेरी बेडकाला वाचविण्याची तयारी सुरु आहे. त्याची प्रजाती संपुष्टात येण्यापासून रोखण्यासाठी हा प्रयत्न आहे. पनामाच्या एम्फीबियन रेस्क्यू अँड कंजर्वेशन प्रोजेक्टचे संचालक रोबर्टो इबानेज यांनी गाम्बोआ एम्फीबियन रिसर्च अँड कंजर्वेशन सेंटरमध्ये सुंदर सोनेरी बेडुक दाखविले, याचे शास्त्राrय नाव एटेलोपस जेटेकी आहे.

या बेडकाला राष्ट्रीय प्रतीक मानले जाते, परंतु आता ही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. गाम्बोआ सेंटर याच बेडुक आणि अन्य लुप्तप्राय बेडकांना वाचविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहे. वैज्ञानिक रोबर्टो इबानेज या प्रोजेक्टला अनेक वर्षांपासून संचालित करत आहेत. आता कैदेत जन्मलेल्या या बेडकांना जंगलांमध्ये परत सोडण्याची तयारी केली जातेय.

Advertisement

पनामियन गोल्डन फ्रॉग पनामाच्या मध्य पर्वतीय भागांमधील वेगाने वाहणाऱ्या नद्यांमध्ये आढळून येत होता. याचे शरीर चमकदार पिवळ्या रंगाचे असते, जे दूरून सोन्यासारखे दिसते. हा बेडुक पनामाची संस्कृती आणि निसर्गाचे प्रतीक आहे. लोक याला समृद्धीचे संकेत मानत होते.

1980 च्या दशकात एक फंगल आजार चायट्रिड फंगस पूर्ण क्षेत्रात फैलावला. या आजाराने बेडकांच्या त्वचेला नष्ट पेल आणि ते श्वास घेऊ शकले नाहीत. 2009 नंतर जंगलांमध्ये हा बेडुक दिसणे जवळपास अशक्य ठरले होते. आता ही प्रजाती जंगलात विलुप्त मानली जाते. केवळ कैदेतच काही बेडुक जन्मले असून ते गाम्बोआ सेंटरसारख्या ठिकाणांवर सुरक्षित आहेत.

रोबर्टो इबानेज यांचा संघर्ष

रोबर्टो इबानेज पनामाचे प्रसिद्ध बेडुकतज्ञ आहेत. ते स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टीट्यूटचे वैज्ञानिक आहेत आणि पनामा एम्फीबियन रेस्क्यू प्रोजेक्टचे प्रमुख आहेत. गाम्बोआ सेंटर पनामा सिटीनजीक वर्षावनाच्या काठावर आहे. येथे लुप्तप्राय बेडकाच्या 12 प्रजातींना वाचविण्यात येत आहे. सेंटरमध्ये सुमारे 1200 बेडुक आहेत, ज्यातील 1000 सोनेरी बेडुक आहेत. वैज्ञानिक तेथे या बेडकांचे प्रजनन करवितात. त्यांची देखभाल करतात. आजारांपासून वाचविण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सर्वाधिक धोक्यात असलेल्या बेडकांची देखभाल करत आहोत. आता त्यांना जंगलांमध्ये परत पाठविण्याची नवी सुरुवात करत आहोत असे रोबर्टो यांनी सांगितले आहे.

चायट्रिड फंगस यासारख्या आजारासोबत जंगलतोड आणि प्रदूष्घ्णाने देखील या बेडकांना नुकसान पोहोचविले आहे. 2009 मध्ये अखेरचा जंगली सोनेरी बेडुक दिसून आला होत. तेव्हा वैज्ञानिकांनी पहिल्यांदा धोका ओळखला होता. स्मिथसोनियन, शेवेन माउंटेन जू, जू न्यू इंग्लंड आणि अन्य संघटनांनी मिळून 2009 मध्ये पनामा एम्फीबियन रेस्क्यू प्रोजेक्ट सुरू केला होता. गाम्बोआ सेंटर 2015 मध्ये सुरू झाले होते. येथे बेडकांचे प्रजन करविले जाते, जेणेकरून त्यांची संख्या वाढेल. आता चालू वर्षात पहिल्यांदाच कैदेत जन्मलेल्या सोनेरी बेडकांना जंगलात सोडण्यात येत आहे. जंगलांमध्ये कितपत ते जिवंत राहतात याचे परीक्षण वैज्ञानिक करणार आहेत.

नवी आशा : जंगलांमध्ये वापसी

फेब्रुवारी महिन्यात रोबर्टो इबानेज आणि त्यांच्या टीमने कैदेत जन्मलेल्या सोनेरी बेडकांना त्यांच्या जुन्या अधिवासातील नद्यांमध्ये सोडले. हे पहिले मोठे पाऊल आहे. बेडकांवर नजर ठेवणारे अनेक वैज्ञानिक टीममध्ये सामील आहेत. 12 आठवड्यांच्या परीक्षणानंतर अनेक बेडकांना पूर्णपणे मुक्त करण्यात आले. यातून फंगसपासून बचावाची रणनीति कोणती असू शकते हे कळणार आहे. पनामा सरकारची संरक्षित क्षेत्र प्रणाली देखील या मोहिमेला साथ देत आहे. सोनेरी बेडुक केवळ एक प्रजाती नव्हे तर पूर्ण इकोसिस्टीमचा हिस्सा आहे. बेडुक किड्यांना फस्त करतात, पर्यावरणाला संतुलित ठेवतात, जर हे बेडुक विलुप्त जाले तर पूर्ण अन्नसाखळी प्रभावित होणार आहे.

Advertisement
Tags :

.