महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अष्टमी, फेस्ताच्या फेरीतून पणजी मनपाला सव्वा कोटी

12:49 PM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

साधनसुविधांसाठी करणार खर्च : महापौर

Advertisement

पणजी : अष्टमी फेरीतून पणजी महापालिकेस 90 लाख ऊपये तर आता नुकत्याच झालेल्या पणजी मेरी इमेक्युलेट चर्च फेस्तामधून 35 लाख ऊपये महसूल प्राप्त झाल्याची माहिती पणजी मनपा आयुक्त क्लेन मदेरा यांनी दिली आहे. सर्व रक्कम मनपाच्या तिजोरीत जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी फेस्ताच्या फेरीतून  14 लाख ऊपये एवढा महसूल मिळाला होता, तर यंदा त्याच्या दुपटीपेक्षा जास्त महसूल आला. यावर्षी दुकाने थाटण्यासाठी विक्रेत्यांना 227 अर्जांची विक्री करण्यात आली होती. प्रत्येकी 200 ऊपये याप्रमाणे अर्ज विक्री झाली. या दोन्ही फेरी पणजी मनपाला लाखो ऊपये मिळवून देतात. या संदर्भात महापौर रोहीत मोन्सेरात यांनी सांगितले की, पणजी शहराच्या विविध विकास कामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. मासळी मार्केट, खुल्या जागा तसेच सार्वजनिक ठिकाणे येथे विविध लोकोपयोगी कामे करण्यात येतील. उत्पन्न वाढवण्याचे आणखी स्त्रोत शोधण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article