For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजी महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू

04:36 PM Feb 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
पणजी महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू
Advertisement

पणजी शहरात आचारसंहिता लागू:आजपासून स्वीकारणार उमेदवारी अर्ज: 11 मार्चला मतदान, 13 रोजी मतमोजणी

Advertisement

पणजी : पणजी महापालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केल्याने आता महापालिका निवडणुकीची धुळवड सुरू होणार आहे. आज मंगळवार 17 फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकृतीला प्रारंभ होणार असून, इच्छुक उमेदवारांचे अर्ज 24 फेब्रुवारीपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत  स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत दिली. आल्तिनो-पणजी येथील राज्य निवडणूक आयोगाच्या परिषदगृहात काल, सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त डिसोझा यांनी निवडणुकीचा तपशील जाहीर केला. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सहाय्यक संचालक सागर गुरव, आयोगाचे सचिव वेनान्सियो फुर्तादो उपस्थित होते. आयुक्त डिसोझा यांनी सांगितले की, पणजी प्रभागात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. महापालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ 29 मार्च रोजी संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर 11 मार्च रोजी महापालिकेसाठी मतदान होणार आहे. 48 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून, सर्व केंद्रांवर मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. जुन्या मतदारयाद्यांच्या आधारेच निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

Advertisement

महापालिका निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची महापालिका निवडणूक अधिकारी (एमसीईओ), तिसवाडी उपजिल्हाधिकारी यांची निर्वाचन अधिकारी (आरओ) म्हणून निवड केली आहे.

पणजी महापालिका निवडणूक कार्यक्रम

  • मंगळवारी 17 मार्चपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ
  • अर्ज सादर करण्याची वेळ : सकाळी दहा ते दुपारी एक
  • अर्जांची छाननी 25 फेब्रुवारी रोजी होणार
  • उमेदवारी मागे घेण्याची मुदत : 26 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत
  • मतदान : 11 मार्च रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत

महापालिका निवडणुकीतील ठळक मुद्दे

  • एकूण मतदार 32 हजार 496
  • 15 हजार 225 पुऊष तर 17 हजार 271 महिला
  • पणजी महापालिकेची प्रभाग संख्या 30
  • उमेदवारांना खर्च मर्यादा :  2.50 लाख ऊपये
  • उमेदवार अर्जासाठी 2 हजार ऊपये शुल्क (सर्वसाधारण गट)
  • आरक्षित वर्गासाठी 1 हजार ऊपये शुल्क
  • पोलिस, भरारी पथके, निरीक्षक मिळून 400 कर्मचारी तैनात

मतमोजणी : 13 मार्च रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर

Advertisement
Tags :

.