पळसंब येथे विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता जलसंधारणाच्या दृष्टीने या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आचरा मॅनेजमेंट स्टडीजच्या संस्था आणि विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दिलेल्या योगदानाबद्दल पळसंबचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने विशेष कृतज्ञतापत्र देऊन संस्थेचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
या उपक्रमासाठी मुंबईस्थित पळसंब ग्रामस्थ गिरीधर पुजारे यांनीही सदिच्छा व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जलसंधारण, पाणी साठवण आणि सामाजिक सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला.
यावेळी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व व्यावसायिक अविराज परब, ऋतुजा सावंत, अरुण पुजारे, प्रमोद सावंत, देऊ सावंत, जीजी सावंत, पांडुरंग सावंत, रमेश परब, दिगंबर साटम, बाळा सावंत, दिवाकर पुजारे, राजन पुजारे, महिला ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील पुनम गोलतकर, अणावकर, सारंग मॅडम, हिंदळेकर, मंगेश सावंत, घाटवळ तसेच अन्य मान्यवरांनी सहभाग घेत श्रमदानासाठी योगदान दिले.
