For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाळणेकोंड धरण भरले; सावंतवाडीकरांची पाणी चिंता मिटली

पाळणेकोंड धरण भरले  सावंतवाडीकरांची पाणी चिंता मिटली
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, बुधवारी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास धरण भरून वाहू लागले. धरणाच्या हायड्रोलिक यंत्रणेतील सर्व सहा दरवाज्यांतून पाणी ओसंडून बाहेर पडत आहे. यंदा ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्याचा काही प्रमाणात परिणामही जाणवला. मात्र, पाळणेकोंड धरण पूर्ण भरल्याने सावंतवाडी शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.