मे मध्ये पाम तेल आयात 33 टक्क्यांनी घटली
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशाची खाद्यतेल आयात चालू वर्षातील मे महिन्यात 33.20 टक्क्यांनी घसरण होत 5,14,022 टनावर पोहोचली आहे, अशी माहिती सॉल्वेंट एक्सट्रक्टर्स असोसिएशन (एसईए) यांनी दिली आहे. मात्र याच महिन्यात आरबीडी पामोलीनच्या आयातीत उल्लेखनीय वाढ राहिली आहे.
भारत जगातील वनस्पती तेलांपैकी प्रमुख खरेदीदार आहे. मे 2021 मध्ये पामतेलाची आयात ही 7,69,602 टनावर राहिली होती. एसईएनुसार मेमध्ये देशातील एकूण वनस्पती तेलाची आयात घटून 10,05,547 टन राहिली असून एक वर्षाच्या अगोदर समान महिन्यात आयात 12,13,142 टन होती. इंडोनेशियाने 23 मे रोजी पामतेलाच्या निर्यातीवरची बंदी काही नियम व अटीनुसार शिथिल केली आहे. यासोबत इंडोनेशियातून निर्यात वाढणार असून जागतिक पातळीवरील किमती प्रभावीत होणार आहेत. पातमेलाच्या उत्पादकांत कच्च्या पाम तेलाची आयात मे महिन्यात घट करुन 4.09 लाख टन राहिली. आरबीडी पामोलीनची आयात वधारुन एक लाख टनाच्या घरात पोहोचली आहे.