महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाम तेलाची आयात 10 महिन्यांच्या नीचांकावर

06:29 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सूर्यफुल तेलाच्या आयातीत 50 टक्क्यांची वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

नोव्हेंबर ते मार्च या चालू तेल वर्षांमध्ये खाद्यतेलांची आयात 17 टक्के कमी राहिली आहे. यातही पाम तेलाची आयात ही दहा महिन्यांच्या नीच्चांकावर पोहोचली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सूर्यफूल तेल स्वस्त झाल्याने पाम तेलाच्या आयातीमध्ये घसरण झाल्याचे कारण सांगितले जात आहे. फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये मार्च महिन्यात सूर्यफुलाचे तेल पन्नास टक्के अधिक आयात करण्यात आले आहे.

 किती स्वस्त सूर्यफूल तेल

कच्च्या पाम तेलाचे दर 1045 डॉलर प्रति टन आहेत तर याच तुलनेमध्ये सूर्यफुल तेलाचे दर 975 डॉलर प्रति टन आहेत. म्हणजेच पाम तेलापेक्षा सूर्यफुलाचे तेल हे 70 डॉलर प्रती टन कमी आहेत.

खाद्य तेलाची आयात किती झाली

एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2023-24 मध्ये (नोव्हेंबर ते मार्चचा कालावधी) 57.65 लाख टन खाद्य तेलाची आयात करण्यात आली आहे. खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 18 टक्के घसरण राहिली आहे. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 69.80 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले होते. खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर तेलांची आयात 18 टक्के घसरून 64,883 टनावर राहिली होती.

सध्याच्या घडीला पाम तेलाच्या आयातीबाबत घसरणीचा सूर दिसून येत आहे. या तुलनेमध्ये सूर्यफुलाचे तेल स्वस्त असल्याकारणाने ते आयातक कंपन्या व उद्योजक  अधिक करत आहेत. इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये कमी साठा आणि उत्पादनात घट झाल्याने पाम तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article