महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पॅलेस्टाईन ‘युएन’च्या स्थायी सदस्यत्वासाठी पात्र

06:23 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमसभेत प्रस्ताव मंजूर : संतप्त इस्रायली राजदुताने सनद फाडली

Advertisement

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्र

Advertisement

अरब देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पॅलेस्टाईनला युएनचा स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव शुक्रवारी ठेवला होता. या प्रस्तावाला भारतासह 143 देशांचा पाठिंबा मिळाला. त्याचवेळी अमेरिका आणि इस्रायलसह केवळ 9 देशांनी या प्रस्तावाला विरोध केला. हा ठराव मंजूर झाल्याने पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य होण्यासाठी पात्र ठरला आहे. पॅलेस्टाईनला स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजूर झाल्यानंतर इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी संताप व्यक्त करत भाषणादरम्यान संयुक्त राष्ट्राची सनद फाडली.

पॅलेस्टाईनने जगात स्वतंत्र देश म्हणून ओळख मिळवण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. मतदानापूर्वी पॅलेस्टाईनचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत रियाद मन्सूर यांनी 193 देशांना पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले होते.  तुमच्या आजच्या निर्णयाने आम्हाला युद्धाच्या काळात स्वातंत्र्य मिळेल, असे आवाहन त्यांनी प्रतिनिधी देशांना केले होते.

इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी पॅलेस्टाईनला सदस्य बनवण्याच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन म्हटले आहे. हा दिवस संयुक्त राष्ट्रासाठी बदनामीचा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल, असेही त्यांनी सांगितले. याचदरम्यान हमासचा संदर्भ देत त्यांनी संयुक्त राष्ट्राने आधुनिक नाझींसाठी आपले दरवाजे उघडल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article