For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ले भाजपच्या वतीने कातकरी समाजासोबत " पालावरची दिवाळी ''

12:42 PM Nov 17, 2023 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ले भाजपच्या वतीने कातकरी समाजासोबत   पालावरची दिवाळी
Advertisement

राजन तेली यांच्या हस्ते कातकरी समाजाला फराळाचे वाटप

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार समाजातील वंचितांना भारतीय हिंदू संस्कृती, सण, समारंभात सामील करून त्यांचे जीवन अधिकाधिक प्रकाशमय करण्यासाठी यावर्षी भाजपाच्या वतीने ‘पालावरची दिवाळी’ साजरी करण्यात आली.भारतीय सण, समारंभ आणि उत्सवांपासून दूर राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सजग राजकीय पक्ष म्हणून भाजपा तर्फे कातकरी समाजा सोबत फराळ देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.

यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी कॅम्प येथील कातकरी वस्तीत जाऊन पालावरची दिवाळी कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवाळी चा फराळ वाटप केला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई, अँड. सुषमा प्रभू-खानोलकर, मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, जिल्हा सदस्य मनवेल फर्नांडिस, माजी सभापती सारिका कळसेकर, महीला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले, राधा सावंत, वृंदा मोर्डेकर, महीला सरचिटणीस वृंदा गवंडळकर, माजी नगरसेविका कृपा मोंडकर, बुथ प्रमुख सुधीर पालयेकर, शेखर काणेकर व रविंद्र शिरसाट, अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, असलम शेख, यश मोंडकर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.