For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पलक गुलियाचे ऑलिम्पिक तिकीट आरक्षित

06:22 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
पलक गुलियाचे ऑलिम्पिक तिकीट आरक्षित
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे भारताची नेमबाज पलक गुलियाने आपले तिकीट आरक्षित केले आहे. या स्पर्धेसाठी कोटा पद्धतीतून प्रवेक्ष मिळविणारी विद्यमान आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन नेमबाज पलक गुलिया ही 20 वी नेमबाज आहे.

हरियाणातील 18 वर्षीय नेमबाज पलक गुलियाने हाँगझाऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल वैयक्तिक नेमबाजीत सुवर्णपदक तर सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. रिओ डी जेनेरिओ (ब्राझील) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या रायफल आणि पिस्तुल नेमबाजी प्रकारासाठीच्या अंतिम ऑलिम्पिक पात्र फेरी स्पर्धेत पलक गुलियाने 217.6 गुण नोंदवित तिसरे स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात अर्मेनियाच्या इल्मिला केरापेटेनने सुवर्ण तर थायलंडच्या साएन्चाने रौप्यपदक घेतले. पिस्तुल आणि रायफल नेमबाजी प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे कमाल 16 नेमबाज पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पुरूष आणि महिलांच्या ट्रॅप व स्किट नेमबाजी प्रकारात भारताच्या नेमबाजांना आणखी चार जागा मिळविता येतील. सदर पात्र फेरीची शॉटगन नेमबाजी स्पर्धा डोहा येथे 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.