For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पलक-मुकेशचा नवा विश्वविक्रम

06:48 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
पलक मुकेशचा नवा विश्वविक्रम
Advertisement

10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत मिळविले सुवर्णपदक

Advertisement

वृत्तसंस्था, ग्रेनाडा (स्पेन)

येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कप रायफल-पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत भारताच्या पलक व मुकेश नेलावल्ली यांनी 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत नवा विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले.

Advertisement

पलक-मुकेश या भारतीय जोडीने एकूण 487.7 गुण नोंदवत पहिले स्थान मिळविले. ह ज्युनियर विभागातीलही विश्वविक्रम आहे. पात्र फेरीतच या जोडीने शानदार प्रदर्शन करीत 581-17 एक्स गुणांची नोंद करीत पदकाच्या फेरीत स्थान मिळविले. चीनच्या कियांगजुन याओ व काय हु यांनी 484.8 गुण घेत रौप्य तर हंगेरीच्या व्हेरोनिका मेजर व अॅकोस कॅरोली नॅगी यांनी एकूण 414.9 गुण घेत कांस्यपदक मिळविले. अंतिम फेरीत पलकने 243.0 तर मुकेशने 244.7 गुण नोंदवले. पात्रता फेरीत भारतीय जोडीने दुसरे तर चिनी जोडीने 586-23 एक्स गुण नोंदवत पहिले स्थान घेतले होते.

18 वर्षीय पलक 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मी. एअर रायफल पिस्तुल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून प्रकाशझोतात आली होते. त्यावेळी तिने 242.1 गुणांचा स्पर्धाविक्रम नोंदवत 2024 पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळविला होता. मुकेश हा आणखी एक उदयोन्मुख पिस्तुल नेमबाज असून तो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनही आहे.

Advertisement
Tags :

.