For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानचा इशारा, भारताचे प्रत्युत्तर

06:46 AM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानचा इशारा  भारताचे प्रत्युत्तर
Advertisement

अमेरिका, ब्रिटन इटली, तुर्कियेची शस्त्रास्त्र  असल्याचा पाकचा दावा : शस्त्रास्त्रांच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर

Advertisement

वृत्तसंस्था/ सिंगापूर

भारत आणि पाकिस्तानदरम्यान मागील महिन्यात सैन्यसंघर्षामुळे वाढलेल्या तणावादरम्यान दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी सिंगापूरमध्ये ‘शांगरी-ला डायलॉगदरम्यान स्वत:चे विचार मांडले आहेत. शांगरी-ला डायलॉगला आशियातील प्रमुख संरक्षण व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.

Advertisement

भारताने काय म्हटले?

भारतीय सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताने राजनयिक स्वरुपात जे पाऊल उचलले आहे, त्यामुळे दहशतवाद सहन न करण्यावरून एक नवी लक्ष्मरेषा निश्चित झाली असल्याचे म्हटले आहे. हे विशेष ऑपरेशन चे मूळ स्वरुपात सैन्य क्षेत्राच्या अंतर्गत येते, ते आमच्या विरोधकांसाठी एक धडा आहे. भारताच्या सहनशीलतेला मर्यादा असल्याचे शत्रू समजून घेईल अशी अपेक्षा आहे. आम्ही जवळपास दोन दशकांपासून छुप्या युद्धाचा सामना करत आहोत आणि आम्ही अनेक लोकांना गमाविले आहे, आम्ही दहशतवादाचा हा प्रकार समाप्त करू इच्छितो असे चौहान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानने मांडलेली भूमिका

पाकिस्तानी सशस्त्र दलांचे ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी’चे अध्यक्ष जनरल साहिद शमशाद मिर्झा यांनी पुन्हा संघर्ष झाला तर स्थिती धोकादायक पातळीवर पोहोचू शकते असा इशारा दिला. पुढील वेळी अशाप्रकारचा संघर्ष झाला आणि शहरांना प्रथम लक्ष्य करण्यात आले, तसेच सीमा अप्रासंगिक ठरली तर स्थिती धोकादायक पातळीपर्यंत बिघडू शकते. मर्यादित कालावधीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपापूर्वीच हानी आणि विनाश झाला असण्याची शक्यता निर्माण होऊ शकते असे मिर्झा यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान स्वत:च्या भूमीवरील दहशतवादाचा सामना करत असून तालिबानशासित अफगाणिस्तानातील समुहांमुळे सीमापार दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी काम करत आहे. दहशतवादामुळे आमच्या देशाला अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले असून हजारो लोक मारले गेले आहेत असा दावा मिर्झा यांनी केला आहे.

भारताने सुनावले

पाकिस्तानचे जनरल मिर्झा यांनी पाकिस्तानकडे अमेरिकन, तुर्कियेकडून निर्मित, इटलीकडून निर्मित शस्त्रास्त्र  असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानकडे सर्व शस्त्रास्त्र उत्पादक देशांची शस्त्रास्त्रs असल्याचे सांगत मिर्झा यांनी भारताला इशारा दिला होता. य् भारत स्वत:च्या संरक्षण गरजांसाठी कुठल्याही एका देशावर निर्भर नाही. आमच्याकडे अनेक प्रकारच्या क्षमता आहेत. यातील बहुतांश क्षमतांचा चांगल्या प्रभावासाठी वापर करण्यात आला असल्याचे जनरल चौहान यांनी सुनावले आहे.

Advertisement
Tags :

.