कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानचा पंतप्रधान भित्रा

06:45 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाक संसदेत खासदाराचा संताप व्यक्त : भारताने घरात घुसून मारले

Advertisement

प्रथम पाकिस्तानचा हवाई हल्ला हाणून पाडणे आणि मग पाकिस्तानी शहरांना लक्ष्य करण्याची कामगिरी भारताने केल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. भारताने वारंवार पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिल्यावर आता तेथील पंतप्रधान लक्ष्य ठरले आहेत. पाकिस्तानच्या संसदेत शाहबाज शरीफ यांची तुलना गिधाडांशी केली जात आहे. भारताने पाकिस्तानच्या इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट समवेत अनेक शहरांना लक्ष्य केल्यावर तेथील संसदेत शाहबाज यांना भित्रा असे संबोधिण्यात आले आहे.

Advertisement

जर एखाद्या सैन्यतुकडीचा प्रमुख वाघासारखा असेल तर सर्वजण वाघासारखे लढतात, परंतु सैन्यतुकडीचा प्रमुख गिधाड असेल तर ते लढू शकत नाहीत, ते पराभूत होतात असे म्हणत पाकिस्तानच्या संसदेत एका खासदाराने पंतप्रधान शाहबाज यांचा पाणउतारा केला.

सध्या सीमेवर उभे आमचे सैन्य राजकीय नेतृत्वाकडे पाहत आहे. त्यांना वाटतेय आमचा नेता धाडसाने सामोरा जाईल. परंतु देशाचा पंतप्रधान भित्रा असल्याने ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नावही उच्चारू शकले नाहीत, मग ते सीमेवर उभ्या सैन्याला कोणता संदेश देणार असे उद्गार एका खासदाराने काढले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article