For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकचे यजमान विंडीजला चोख प्रत्युत्तर

06:40 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकचे यजमान विंडीजला चोख प्रत्युत्तर
Advertisement

अब्दुल्ला शफीकचे नाबाद शतक तर बाबर आझमचे नाबाद अर्धशतक, विंडीजच्या चेस, ग्रीव्ह्ज यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था, पोर्ट ऑफ स्पेन

अब्दुल्ला शफीकचे दमदार नाबाद शतक तसेच कर्णधार बाबर आझमच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या दुसऱ्या दिवशी पाकने पहिल्या डावात 2 बाद 266 धावा जमवित यजमान विंडीजला चोख प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी विंडीजचा पहिला डाव 344 धावांवर समाप्त झाला.

Advertisement

या मालिकेत विंडीजने पहिला सामना जिंकून पाकवर आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी पावसाचा बराच अडथळा आला होता. विंडीजने 5 बाद 239 धावा या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 344 धावांवर उपाहारावेळी आटोपला. विंडीजच्या पहिल्या डावात अष्टपैलू ग्रिव्ह्जने सर्वाधिक म्हणजे 73 तर रॉस्टन चेसने 70 धावा झळकविल्या. रॉस्टन चेसने समयोचित फलंदाजी करत सहाव्या गड्यासाठी 96 धावांची भागिदारी केल्याने विंडीजला पहिल्या डावात 300 धावांचा टप्पा ओलांडता आला. विंडीजच्या पहिल्या डावात पाकचा फिरकी गोलंदाज साजीद खानने 85 धावांत 4 गडी बाद केले. या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत ही खेळपट्टी दुसऱ्या दिवशी फलंदाजीला अधिक अनुकूल ठरली. विंडीजचे शेवटचे पाच फलंदाज 105 धावांची भर घालत तंबूत परतले. ग्रिव्ह्जने 9 चौकारांसह 73 तर कर्णधार चेसने 11 चौकारासह 70 तसेच रॉचने 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या. पाकतर्फे मोहम्मद अली, उबेद शहा, अली उस्मान यांनी प्रत्येकी 2 तर साजीद खानने 85 धावांत 4 गडी बाद केले. उपाहारावेळी विंडीजचा पहिला डाव 344 धावांवर आटोपला.

पाकच्या पहिल्या डावाला दमदार सुरुवात झाली. सलामीचा फलंदाज अझान आवेशने आक्रमक फटकेबाजी करत 11 चौकारांसह 55 धावा झोडपल्या. कसोटीतील आवेशचे हे पहिले अर्धशतक आहे. वॉरीकेनच्या गोलंदाजीवर आवेश पायचीत झाला. इमामुल हकने 14 धावा जमविल्या. त्यानंतर अब्दुला शफीक आणि बाबर आझम या जोडीने पाकचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 168 धावांची भागिदारी केली. मोहम्मद शफीक आणि बाबर आझम यांनी केवळ 139 चेंडूत शतकी भागिदारी केली. शफीक आणि बाबर आझम यांनी विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर होकारात्मक फलंदाजी केली. सलामीचा इमामुल हक जोसेफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर अझान आवेश आणि अब्दुल्ला शफीक यांनी दुसऱ्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी केली. आवेशने 61 चेंडूत 9 चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. यानंतर वॉरीकेनने आवेशला पायचीत केले. विंडीजच्या गोलंदाजांना यानंतर मात्र दिवसअखेरपर्यंत यश मिळाले नाही. चहापानावेळी पाकने 32 षटकांत 2 बाद 139 धावांपर्यंत मजल मारली होती. यावेळी शफीक 37 तर बाबर आझम 32 धावांवर खेळत होते.

खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये शफीक आणि बाबर आझम यांनी संघाला सुस्थितीत नेले. या कालावधीत पाकने 141 धावांची भर घालताना एकही गडी गमविला नाही. अब्दुल्ला शफीकने 173 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह शानदार शतक झळकविले. बाबर आझमने 67 चेंडूत 8 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी दीड शतकी भागिदारी 230 चेंडूत पूर्ण केली. दिवसअखेर या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 168 धावांची अभेद्य भागिदारी केली. पाकचा संघ अद्याप 78 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत. विंडीजतर्फे वॉरीकेन आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : विंडीज प. डाव सर्वबाद 344 (ग्रिव्ह्ज 73, चेस 70, किंग 46, होप 29, जंगू 26, रॉच 19, अवांतर 35, साजिद खान 4-85, मोहम्मद अली, उबेद शहा आणि अली उस्मान प्रत्येकी 2 बळी). पाक प. डाव 66 षटकांत 2 बाद 266 (आवेश 55, इमामुल हक 14, अब्दुल्ला शफीक खेळत आहे 107, बाबर आझम खेळत आहे 86, वॉरीकेन, जोसेफ प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.