For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानची प्रसिद्ध बाइकर जेनिथ

06:45 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानची प्रसिद्ध बाइकर जेनिथ
Advertisement

पित्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उचलले धाडसी पाऊल

Advertisement

सोलो ट्रिप अनेक लोकांना पसंत असते. परंतु पाकिस्तानच्या लाहोर येथे राहणारी जेनिथ इरफानने स्वत:च्या याच छंदामुळे नाव कमाविले आहे. आपण बाइकने पूर्ण जगाची सैर करावी असे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. जेनिथने वडिलांचे हेच स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. पूर्ण पाकिस्तान बाइकने व्यापणारी जेनिथ ही तेथील पहिली मोटर बाइकर ठरली आहे.

29 वर्षीय जेनिथ इरफान अनेक वर्षांपासून एकटीच बाइकने प्रवास करते. तिच्या जीवनावर ‘मोटरसायकल गर्ल’ नावाचा चित्रपटही निर्माण करण्यात आला आहे. जेनिथ 12 वर्षांच्या वयापासून बाइक चालवत आहे. देशभरात तिने एकट्याने प्रवास केला आहे. वादळ असो किंवा पाऊस ती प्रवास करत राहिली आहे. 20 वर्षे वय असताना तिने नॉर्दर्न पाकिस्तानचा प्रवास पूर्ण केला होता. तसेच पाकव्याप्त काश्मीरची ट्रिपही तिने बाइकने पूर्ण केली आहे.

Advertisement

जीनतचा जन्म युएईच्या शारजाहमध्ये झाला होता. परंतु वयाच्या 12 व्या वर्षापासून ती पाकिस्तानात राहत आहे. ब्लॅक आणि ग्रे रायडिंग जॅकेटमध्ये जेव्हा बाइक घेऊन जीनत रस्त्यांवर निघते तेव्हा तिला पाहून लोक आनंदी होतात, तिचे कौतुक करू लागतात. मुलींनी जाणे सुरक्षित नसल्याचे मानले जाणाऱ्या ठिकाणीही ती एकटीच फिरली आहे.

जीनत स्वत:ची ट्रॅव्हल स्टोरी शेअर करत असते. ती आता पाकिस्तानातील स्टार ठरली आहे. माझी आई अत्यंत उदारमतवादी आहे. तिच्याकडूनच मला ही शक्ती मिळाली आहे. पाकिस्तानात मुलींना फारसे स्वातंत्र्य नसले तरीही मी धाडस करून बाइकने फिरत आहे. माझ्या या ध्यासामुळे अनेक लोकांची मानसिकता बदलली असल्याचे ती सांगते. जीनतने फेसबुकवर नदी ओलांडतात, आदिवासींसोबत आणि ट्रकचालकांसोबतची छायाचित्रे शेअर केली असून त्यांना हजारो लाइक्स प्राप्त झाल्या आहेत.

Advertisement
Tags :

.