पाकचा अमिर जमाल जखमी
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाक क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज अमिर जमाल याला दुखापत झाल्याने त्याला आगामी बांगलादेश बरोबर होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने पाक संघाची घोषणा केली.
इंग्लिश क्रिकेट कौंटी स्पर्धेत खेळताना अमिर जमालच्या पाठीला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झाला नसल्याने निवड समितीने त्याला आगामी मालिकेसाठी वगळण्याचा निर्णय घेतला आहे. पाक आणि बागंलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या बुधवारपासून प्रारंभ होत आहे. पाक संघात शाहीन आफ्रिदी तसेच नसिम शहा हे प्रमुख वेगवान गोलंदाज असून त्यांना खुर्रम शेहजाद आणि मीर हमझा यांची साथ लाभणार आहे. शान मसूदकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून सौद शकील उपकर्णधार राहिल.
पाक संघ: शान मसुद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), शफीक, बाबर आझम, खुर्रम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरेरा, मोहम्मद रिझवान, नसीम शहा, सैईम आयुब, सलमान अली आगा, सर्फराज अहम्मद आणि शाहीन आफ्रिदी