महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

येथे पाकिस्तानचा अजेंडा नाही चालू देणार!

09:47 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जम्मू-काश्मीरच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम निर्धार, ‘तीन कुटुंबां’वर शरसंधान

Advertisement

वृत्तसंस्था/जम्मू-श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा अजेंडा आम्ही लागू होऊ दिला जाणार नाही. जगातील कोणतीही शक्ती या प्रदेशात कलम 370 पुन्हा लागू करू शकत नाही, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते जम्मूतील कटरा येथे भाषण करत होते. त्यांनी या प्रदेशात पूर्वी सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांवर कडाडून टीकाही केली.

काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या प्रदेशात पाकिस्तानचा कार्यक्रम राबवित आहेत. या पक्षांचे बोटचेपे धोरण या प्रदेशाच्या सर्व समस्यांचे आणि ऱ्हासाचे मूळ आहे. या प्रदेशाचा विकास करतानाही या पक्षांनी पक्षपाती भूमिका दर्शविली आहे. जम्मू भागाचा विकास हेतुपुरस्सर रोखण्यात आला. रियासी आणि उधमपूर भागाला विकासापासून वंचित ठेवण्यात आले. आज जो चिनाब सेतू या भागाचे प्रमुख वैशिष्ट्या बनला आहे, त्याच्या निर्माण कार्याचा प्रारंभ अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात करण्यात आला होता. काँग्रेसच्या दहा वर्षांमध्ये या निर्माणकार्याची गती रोखण्यात आली. 2014 नंतर या सेतूचे काम पूर्ण करण्यात आले. काँग्रेसचे आणि विकासाचे काही देणेघेणे नाही, असा घणाघात त्यांनी भाषणात केला.

ही निवडणूक महत्वपूर्ण

सध्या होत असलेली विधानसभा निवडणूक ही या प्रदेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. या प्रदेशाच्या भक्कम भविष्यासाठी भारतीय जनता पक्षाला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. जो पक्ष हिंदूंच्या देवदेवतांचाही सन्मान राखू शकत नाही, तो देशाला प्रगतीपथावर नेऊ शकत नाही. मतदारांनी या प्रदेशाच्या हितासाठी वंशवादी कुंटुंबांना सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीनगरमध्ये प्रचंड सभा

कटरा येथील सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर येथेही एका विशाल सभेत भाषण केले. जम्मू-काश्मीर प्रदेशाची सर्वाधिक हानी तीन कुटुंबांनी केली. आज या प्रदेशात प्रथमच अनुच्छेद 370 निष्प्रभ केला असतानाच्या विधानसभा निवडणूक होत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या प्रथम मतदान टप्प्यात मतदारांनी ज्या उत्साहाने मतदान केले ते पाहता ही परिवर्तनाची सुचिन्हे असल्याचे अनुभवास येते. येथील नवयुवकांच्या हाती पूर्वी दगड दिले जात असत. आज हेच युवक आणि युवती हातांमध्ये लेखणी आणि पुस्तके घेत आहेत. त्यांना आता दहशतवादापासून दूर जाऊन स्वत:चे भविष्य घडविण्यात स्वारस्य वाटू लागले आहे. हे नवयुवक आता या घराण्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. इतके दिवस ते ‘नफरत का सामान’ विकत होते. आज त्यांची मनोवृत्ती सकारात्मक आहे. हा आमच्या धोरणांचा परिणाम आहे, अशी भलावण त्यांनी भाषणात केली.

मतदानाचा विक्रम करा

बुधवारी पार पडलेल्या मतदानाच्या प्रथम टप्प्यात, गेल्या सात निवडणुकांमध्ये झाले नव्हते, तेव्हढे मतदान झाले आहे. मतदारांनी असाच उत्साह ही निवडणूक संपेपर्यंत ठेवावा. मतदानाच्या पुढच्या दोन टप्प्यांमध्ये याहीपेक्षा अधिक मतदान करुन नवनवे विक्रम मतदारांनी करावेत. मतदारांचे शोषण करणाऱ्या खानदानी कुटुंबातील सदस्यांना आता पुन्हा सत्तेचा मोह सुटला आहे. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर खोटे नाटे आरोप करण्यास प्रारंभ केला आहे. तथापि, प्रदेशातील जनता सूज्ञ असून ती या कुटुंबांची कायमची हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाही. या कुटुंबांची वर्चस्व आता संपणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पहिल्या टप्प्यात 61.13 टक्के मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या मतदान टप्प्यात 61.13 टक्के मतदान झाले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. मतदानाची ही टक्केवारी गेल्या सात विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आली नव्हती. हा मतदानाचा एक विक्रमच आहे. मतदानाचे आणखी दोन टप्पे आता उरलेले असून सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article