कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानी मंत्र्याची भारतावर अणुबॉम्ब हल्ल्याची दर्पोक्ती

06:24 AM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

130 क्षेपणास्त्रे सज्ज असल्याचाही गवगवा

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली. आम्ही भारतासाठी शाहीन, घोरी आणि गझनवी सारखी 130 क्षेपणास्त्रs ठेवली आहेत. जर भारताने सिंधू पाणी करार थांबवला तर आपण त्यांचा श्वास रोखू. भारताने युद्धासाठी तयार राहिले पाहिजे. पाकिस्तानची अण्वस्त्रs केवळ सजावटीसाठी ठेवली जात नाहीत, तर आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रs लपवून ठेवली आहेत, असे अब्बासी म्हणाले. आमची क्षेपणास्त्रs भारतावर हल्ला करण्यासाठीच आहेत असे सांगताना आमच्याकडे शस्त्रs असल्यामुळेच भारत आमच्यावर हल्ला करत नाही, असेही सदर मंत्री पुढे बरळला.

भारत आपल्या सुरक्षेतील त्रुटी मान्य करण्याऐवजी पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोष देत आहे. पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कोणत्याही आर्थिक कारवाईला तोंड देण्यास देश तयार आहे. पाकिस्तानला पाणीपुरवठा थांबवण्याच्या आणि व्यापारी संबंध तोडण्याच्या भारताच्या निर्णयाची हनीफ अब्बासी यांनी खिल्ली उडवली. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. भारताचा विमान वाहतूक उद्योग अवघ्या दोन दिवसांत अडचणीत आला. भारताला आपली चूक कळली आहे. जर आपण 10 दिवस हवाई क्षेत्र बंद ठेवले तर भारतीय विमान कंपन्या दिवाळखोरीत निघतील, असेही ते पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article