For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफगाणिस्तानात शिरली पाकिस्तानी लढाऊ विमाने

06:22 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
अफगाणिस्तानात शिरली पाकिस्तानी लढाऊ विमाने
Advertisement

सीमेवर गरजल्या तोफा : तालिबानकडुन धमकी

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर 

पाकिस्तानी सैन्य आणि तालिबान यांच्यात सीमेवरील तणाव अत्यंत अधिक वाढला आहे. पाकिस्तानचे सैन्य टीटीपीच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी अफगाणिस्तानच्या क्षेत्रात स्वत:ची लढाऊ विमाने आणि किलर ड्रोन्स पाठवित आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या कृतीमुळे तालिबान भडकला असून डूरंड रेषेवर आता दोन्ही बाजूने तोफा धडाडू लागल्या आहेत. तोरखम सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्य आणि तालिबान यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे.

Advertisement

पाकिस्तानी सैन्याने दोन अफगाण मुले आणि एका महिलेची हत्या केली असल्याचे अफगाण गृह मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही बाजूंकडून सध्या संघर्ष सुरू असून तोफांद्वारे मारा केला जात आहे. तालिबान आणि पाकिस्तान सैन्यादरम्यान एाक तपासणी नाक्याच्या निर्मितीवरूनही तणाव भडकला आहे.

पाकिस्तानी सैन्याची लढाऊ विमाने कुनार आणि नानगरहार प्रांतांमध्ये दाखल होत आहेत. कुठल्याही देशाला अफगाणिस्तानच्या हवाईक्षेत्राचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानच्या या कृतीविरोधात आम्ही कठोर कारवाई करणार आहोत असे तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी सांगितले आहे.

तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यादरम्यान टीटीपीच्या दहशतवाद्यांवरून वाद आहे. टीटीपीचे दहशतवादी पाकिस्तानच्या सरकारला इस्लामविरोधी मानतात. टीटीपीच्या हल्ल्यात आतापर्यंत मोठ्या संख्येत पाकिस्तानी सैनिक आणि नागरिक मारले गेले आहेत. पाकिस्तानात शरीया कायदा लागू करण्याचे लक्ष्य टीटीपीने बाळगले आहे. पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तान प्रांतातील अनेक भूभागांवर टीटीपीने कब्जा केला आहे.

Advertisement
Tags :

.