For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानी लष्करप्रमुखांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद

06:48 AM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानी लष्करप्रमुखांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद
Advertisement

इराण-अमेरिका सलोख्यासाठी प्रयत्न सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद, वॉशिंग्टन

मध्यपूर्वेतील युद्धाचे वाढते सावट आणि राजनैतिक कोंडीच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट संपर्क साधला आहे. सूत्रांनुसार, जनरल मुनीर यांनी ट्रम्प यांना फोन करून होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील अमेरिकेची नाकेबंदी उठवण्याची विनंती केली. याचदरम्यान इराणने अमेरिकेवर अविश्वास व्यक्त करत इस्लामाबादमधील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्यास पूर्णपणे नकार दिल्याचे समजते.

Advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्याशी फोनवर संवाद साधला. एका पाकिस्तानी सुरक्षा सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझवरील नाकेबंदीबाबत व्यक्त केलेल्या चिंतांचा विचार करू, असे ट्रम्प म्हणाले. सूत्रांनुसार, दोघांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. जर होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी सुरूच राहिली, तर इराणसोबतची चर्चा पुढे जाऊ शकणार नाही, असे असिम मुनीर यांनी ट्रम्प यांना सांगितले. यावर विचार करू असे सांगून ट्रम्प यांनी प्रतिसाद दिला. अमेरिकेने इराणजवळ सागरी नाकेबंदी लादल्यामुळे इराण संतप्त झाला आहे. अमेरिकेच्या ताठर भूमिकेमुळे इराणने शनिवारपासून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे.

Advertisement
Tags :

.