For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानी सैन्यप्रमुखाने ओकली गरळ

06:41 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानी सैन्यप्रमुखाने ओकली गरळ
Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

Advertisement

पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल आसीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. मुनीर यांनी काश्मीरला पाकिस्तानच्या गळ्यातील नस संबोधिले आहे. भारताने भविष्यात कुठल्याही हल्ला केला तर पाकिस्तान निर्णायक प्रत्युत्तर देणार असल्याची दर्पोक्ती मुनीर यांनी केली आहे. कराची येथील पाकिस्तान नेव्हल अकॅडमीत एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुनीर यांनी पाकिस्तान  क्षेत्रीय स्थिरतेचा वाहक असून दरवेळी भारतीय आक्रमकतेला संयम अन् परिपक्वतेसह प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे.

मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरला पाकिस्तानची ‘जुगुलर वेन’ (गळ्याची नस) संबोधिले.  आम्ही काश्मीरला कधीच विसरणार नाही. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रस्ताव, काश्मिरी जनतेच्या आकांक्षांच्या अनुरुप न्यायपूर्ण तोडग्यासाठी आवाज उठवत राहिल, असे वक्तव्य मुनीर यांनी केले.

Advertisement

भारताने चिथावणीशिवाय पाकिस्तानवर दोनवेळा हल्ला केला आहे. हा प्रकार रणनीतिक दूरदर्शितेच्या चिंताजनक अभावाला दर्शवित असल्याचा कांगावा मुनीर यांनी केला. याचबरोबर मुनीर यांनी भारताला क्षेत्रीय तणावासाठी जबाबदार ठरविण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात निर्णायक लढाईच्या अंतिम टप्प्यात असताना भारताने तणाव निर्माण करत पाकिस्तानला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा कांगावाही मुनीर यांनी केला आहे. तर पाकिस्तान स्वत:च दहशतवादाला बळ पुरवून सीमापार घुसखोरी घडवून आणण्यासाठी कुख्यात राहिला आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची  क्रूर हत्या केली होती. यानंतर भारताने पाकिस्तानवरील दबाव वाढवत सिंधू जल करार स्थगित करण्याची घोषणा केली होती. तसेच ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी अ•dयांना उद्ध्वस्त केले होते.दहशतवाद्यांच्या घुसखोरीला सहन केले जाणार नाही. तसेच दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना आता त्वरित प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे भारताने स्पष्ट पेले आहे.

Advertisement
Tags :

.