महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेवटच्या सामन्यात पाक विजयी

06:35 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लॉडरहिल, फ्लोरिडा

Advertisement

2024 च्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या अ गटातील सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा 7 चेंडू बाकी ठेऊन 3 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात पाकला मात्र विजयासाठी आयर्लंडने चांगलेच झुंजविले. पाकचे प्राथमिक फेरीतच आव्हान यापूर्वीच संपुष्टात आल्याने त्यांनी या विजयाने स्पर्धेचा समारोप केला.

Advertisement

या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने 20 षटकात 9 बाद 106 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 18.5 षटकात 7 बाद 111 धावा जमवित कसाबसा विजय नोंदविला.

आयर्लंडच्या डावामध्ये डिलेनीने 19 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 31 तर लिटलने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 22, अॅडेरने 2 चौकारांसह 15, डॉक्रेलने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 4 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शाहिन आफ्रिदी आणि इमाद वासिम यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद आमीरने 2 तसेच हॅरिस रौफने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावामध्ये कर्णधार बाबर आझमने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 34 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 32 धावा जमविल्या. सलामीच्या रिझवानने 2 चौकारांसह 17 तर सईम अयुबने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, अब्बास आफ्रिदीने 21 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 17 तसेच शाहिन आफ्रिदीने 5 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 13 धावा जमविल्या. पाकच्या डावामध्ये 4 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे मॅकार्थीने 15 धावांत 3, कॅम्फरने 24 धावांत 2 तसेच अॅडेर आणि व्हाईट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आयर्लंड आणि पाकिस्तान यांचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले असून भारत आणि अमेरिका यांनी या गटातून सुपर 8 फेरी गाठली आहे.

संक्षिप्त धावफलक - आयर्लंड 20 षटकात 9 बाद 106 (डिलेनी 31, लिटल नाबाद 32, डॉक्रेल 11, अॅडेर 15, अवांतर 10, शाहिन आफ्रिदी 3-22, इमाद वासिम 3-8, मोहम्मद आमीर 2-11, रौफ 1-17), पाक 18.5 षटकात 7 बाद 111 (बाबर आझम नाबाद 32, रिझवान 17, सईम आयुब 17, अब्बास आफ्रिदी 17, शाहिन आफ्रिदी नाबाद 13, मॅकार्थी 3-15, कॅम्फर 2-24, अॅडेर 1-24, व्हाईट 1-11).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article