For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाक महिला संघाची घोषणा

06:14 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाक महिला संघाची घोषणा
Advertisement

वृत्तसंस्था, इस्लामाबाद

Advertisement

झिम्बाब्वे महिला संघाविरुद्ध होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यांचा पाक महिला संघाची घोषणा करण्यात आली. पाक आणि झिम्बाब्वे महिला संघातील या वनडे मालिकेला 4 मेपासून प्रारंभ होणार आहे. पाक संघात मोमिना रियासत या एकमेव नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. फातिमा सनाकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार आहे. तसेच 2025 ते 2029 या कालावधीत होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या विविध महत्त्वाच्या स्पर्धांसाठी पाक महिला संघाची पूनर्बांधणी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. पाकच्या महिला क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मालिका गमवाव्या लागल्या आहेत. झिम्बाब्वेचा महिला संघ पहिल्यांदाच वनडे मालिका खेळण्यासाठी पाकमध्ये येणार आहेत. 29 एप्रिलला झिम्बाब्वेचा महिला संघ कराचीत दाखल होईल. वनडे मालिकेतील पहिला सामना 4 मे, दुसरा सामना 6 मे आणि तिसरा सामना 9 मे रोजी खेळविला जाईल. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेतील सामने 12, 14 आणि 15 मे रोजी कराचीच्या नॅशनल बँक स्टेडियमवर खेळविले जातील.

Advertisement

पाक महिला संघ : फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, आयेशा जाफर, डायना बेक, गुल फिरोजा, मोमिना रियासत, मुनिबा अली, नाजिहा अल्वी, नेशरा संधु, नातालिया परवेज, रमीन शमीम, सदाफ शमास, सिद्रा अमीन, सायेदा शाह, तस्मिया रुबाब.

Advertisement
Tags :

.