कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकचा द. आफ्रिकेवर मालिका विजय

06:40 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

यजमान पाकने दक्षिण आफ्रिकेचा 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यात सामनावीर बाबर आझमच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकने दक्षिण आफ्रिकेचा 4 गड्यांनी पराभव केला. पाकच्या फईम अश्रफला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या शेवटच्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 139 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 19 षटकात 6 बाद 140 धावा जमवित आपला विजय नोंदविला.  या मालिकेतील दक्षिण आफ्रिकेने रावळपिंडीचा पहिला सामना 55 धावांनी जिंकला होतो. त्यानंतर पाकने लाहोरमधील सलग दोन सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आणले.

दक्षिण आफ्रिकेच्या डावात रेझा हेंड्रीक्सने 34, ब्रेव्हिसने 21 धावा जमविल्या. बॉशने 23 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 30 धावा केल्या. पाकतर्फे उस्मान तारिकने 26 धावांत 2 तर शाहिन आफ्रिदीने 26 धावांत 3 गडी बाद केले. मोहम्मद नवाज व अश्रफ यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

प्रत्युत्तरदाखल खेळताना पाकच्या डावात बाबर आझमने 46 चेंडूत 68 धावांची खेळी केली. टी-20 प्रकारातील आझमचे हे 37 वे अर्धशतक आहे. पाकचा सईम आयुब खाते उघडू शकला नाही. सलमान अली आगाने 33 धावा जमविताना बाबर आझमसमवेत 76 धावांची भागिदारी केली. पाकने या सामन्यात 14 धावांत 4 गडी गमाविले. त्यानंतर बाबर आझम संघाला विजयासाठी 15 धावांची गरज असताना बाद झाला. पण पाकच्या इतर फलंदाजांनी विजयाचे उद्दिष्ट गाठले. बाबर आझमने या सामन्यात सलग 3 चौकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेतर्फे विलियम्स आणि सिमलेनी यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक - द. आफ्रिका 20 षटकात 9 बाद 139 (हेंड्रीक्स 34, ब्रेव्हिस 21, बॉश नाबाद 30, शाहिन आफ्रिदी 3-26, उस्मान तारीक 2-26, मोहम्मद नवाज, फईम अश्रफ प्रत्येकी 1 बळी), पाक 19 षटकात 6 बाद 140 (बाबर आझम 68, सलमान अली आगा 33, विल्यम्स 2-26, सिमलेन 1-23).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article