For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकचा अमिरातवर 10 गड्यांनी विजय

06:22 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकचा अमिरातवर 10 गड्यांनी विजय
Advertisement

महिलांची टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धा, गुल फिरोजा सामनावीर

Advertisement

► वृत्तसंस्था/डंबुला

2024 च्या महिलांच्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथे मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात पाक महिला क्रिकेट संघाने संयुक्त अरब अमिरातचा (युएई) 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात नाबाद 62 धावांची खेळी करणारी पाकची सलामीची फलंदाज गुल फिरोजाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून अमिरातला प्रथम फलंदाजी दिली. अमिरातने 20 षटकात 8 बाद 103 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 14.1 षटकात बिनबाद 107 धावा जमवित विजय नोंदविला. या स्पर्धेतील हा नववा सामना आहे.

अ गटातील या सामन्यात अमिरातच्या डावात सलामीच्या तीर्था सतीशने 36 चेंडूत पाच चौकारांसह 40, कर्णधार इशा ओझाने 26 चेंडूत 2 चौकारांसह 16, खुशी शर्माने 13 चेंडूत 12 धावा जमविल्या. अमिरातच्या डावात 8 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे सादिया इक्बाल, नेशरा संधू, तुबा हासन यांनी प्रत्येकी 2 गडी तर निदा दारने 1 गडी बाद केला. अमिरातने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 24 धावा जमविल्या. अमिरातचे अर्धशतक 65 चेंडूत तर शतक 117 चेंडूत फलकावर लागले. अमिरातने 10 षटकाअखेर 2 बाद 44 धावा जमविल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकची सलामीची जोडी गुल फिरोजा आणि मुनिबा अली यांनी 14.1 षटकात पहिल्या गड्यासाठी 107 धावांची अभेद्य शतकी भागिदारी केली. फिरोजाने 55 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 62 तर मुनिबा अलीने 30 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 37 धावा जमविल्या. पाकने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 42 धावा जमविल्या. पाकचे अर्धशतक 46 चेंडूत तर शतक 82 चेंडूत नोंदविले गेले. फिरोजा आणि मुनिबा यांनी अर्धशतकी भागिदारी 46 चेंडूत तर शतकी भागिदारी 82 चेंडूत नोंदविली. फिरोजाने अर्धशतक 8 चौकारांच्या मदतीने 46 चेंडूत पूर्ण केले. पाकच्या डावात 12 चौकार नोंदविले गेले. या विजयामुळे पाकला 2 गुण मिळाले. फिरोजाने नाबाद अर्धशतक झळकविले. तसेच तिने दोन अप्रतिम झेल घेतले.

संक्षिप्त धावफलक: युएई 20 षटकात 8 बाद 103 (तीर्था सतीश 40, ओझा 16, खुशी शर्मा 12, सादिया इक्बाल 2-11, नेशरा संधू 2-22, तुबा हासन 2-17, निदा दार 1-15), पाव: 14.1 षटकात बिनबाद 103 (गुल फिरोजा नाबाद 62, मुनिबा अली नाबाद 37, अवांतर 8).

Advertisement
Tags :

.