कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युद्धभूमीवर 4 दिवसही लागणार नाही पाकचा टिकाव

06:55 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दारुगोळा, शस्त्रास्त्रांची स्थिती बिकट

Advertisement

► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या पहलगामममध्ये 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 26 निर्दोशा पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. भारताने या नरसंहारानंतर पाकिस्तानच्या विरोधात काही कठोर कूटनीतिक पावले उचलली आहेत, यात सर्वात मोठा निर्णय 1960 चा सिंधू जल करार निलंबित कणे आहे. तसेच पहलगाम हल्ल्यातील निर्दोष नागरिकांच्या हत्येत सामील दहशतवादी, त्यांचे म्होरके आणि या हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला भारताच्या संभाव्य प्रत्युत्तरादाखल कारवाईची भीती सतावत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि तेथील अन्य नेते भारताला धमकी देत आहेत, परंतु आकडेवारी आणि पाकिस्तानची सद्य आर्थिक स्थिती पाहता तो युद्धात भारतासमोर चार दिवसांपेक्षा अधिक काळापर्यंत टिकून राहु शकत नाही. पाकिस्तानी सैन्य दारूगोळ्याच्या मोठ्या कमतरतेला सामोरे जात आहे. ही कमतरता प्रामुख्याने पाकिस्तानने युक्रेन आणि इस्रायलसाब्sात केलेल्या शस्त्रास्त्र कारणांमुळे निर्माण झाली आहे. यामुळे पाकिस्तानचा दारूगोळ्याचा साठा कमी झाला आहे.

96 तास पुरेल इतका दारुगोळा

क्षेत्रीय संघर्षाच्या शक्यतांदरम्यान सैन्याला दारुगोळ्याचा पुरवठा करणाऱ्या पाकिस्तानी ऑर्डिनेन्स फॅक्ट्री (पीओएफ) वाढती जागतकि मागणी आणि स्वत:च्या कालबाह्या उत्पादन केंद्रादरम्यान संतुलन राखण्यासाठी धडपड करत आहे. कमी होणाऱ्या पुरवठ्यामुळे पाकिस्तानचा दारूगोळा साठा केवळ 96 तासांपर्यंतच्या युद्धाला झेलण्यास सक्षम आहे, यामुळे त्याचे सैन्य असुरक्षित झाले आहे. भारतीय सैन्याच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडे स्वत:च्या एम109 हॉवित्झरसाठी 155 मिमीचे तोफगोळे किंवा बीएम-21 सिस्टीमसाठी 122 मिमी रॉकेट पुरेशा संख्येत उपलब्ध नाहीत. 155 मिमीचे तोफगोळे युक्रेनला पाठविण्यात आले होते, यामुळे पाकिस्तानच्या दारूगोळ्याचा भांडार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पाकिस्तानी संरक्षण विभाग दारूगोळ्याच्या कमतरतेवरून अत्यंत चिंतेत आहे. 2 मे रोजी स्पेशल कोर कमांडर्सच्या परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

रेशनमध्ये कपात

पाकिस्तानने संभाव्य भारतीय कारवाईच्या शक्यतेदरम्यान भारत-पाकिस्तान सीमेनजीक दारूगोळ्याच्या डेपोची निर्मिती केली आहे. दीर्घकाळापर्यंतच्या संघर्षाच्या स्थितीत भारताचे आव्हान पेलण्यासाठी पाकिस्तानकडे दारूगोळा आणि आर्थिक शक्तीची कमतरता असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी दिली होती. पाकिस्तानसमोर सर्वात मोठे आव्हान त्याची कोलमडून पडण्याच्या स्थितीतील अर्थव्यवस्था आहे. जीडीपेच्या तुलनेत कर्जाचा डोंगर असून विदेशी चलन साठा देखील नीचांकी स्तरावर आहे. पाकिस्तानी सैन्याला इंधनाच्या कमतरतेमुळे रेशनमध्ये कपात करावी लागत असून असून सैन्याभ्यास स्थगित करणे भाग पडले आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article