For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तान सायबर फ्रॉडचे नवे जागतिक केंद्र

06:09 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तान सायबर फ्रॉडचे नवे जागतिक केंद्र
Advertisement

212 जणांच्या अटकेने इंटरनॅशनल स्कॅमचे नेटवर्क उघड

Advertisement

वृत्तसंस्था, इस्लामाबाद

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबामध्ये तीन अवैध कॉल सेंटर्सवर कारवाई झाली आहे. या कारवाईत 212 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात 7 चिनी नागरिक सामील आहेत. कारवाईच्या अंतर्गत 306 मोबाइल फोन, 383 संगतक/सीपीयू आणि 299 मॉनिटर-लॅपटॉपही हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत भारत आणि ब्राझीलमधून नेटवर्कचे लिंक समोर आले आहे. पाकिस्तानात सायबर फ्रॉडचे वाढते नेटवर्क आणि चीनशी संबंधित ऑपरेटर्समुळे चिंता वाढली आहे.

Advertisement

इस्लामाबादमध्ये नॅशनल सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एजेन्सीने मागील 24 तासांमध्ये तीन अवैध कॉल सेंटर्सवर छापे टाकत 212 जणांना ताब्यात घेतले. या आरोपींमध्ये पाकिस्तानी नागरिकांसोबत चिनी नागरिकही सामील आहेत. पाकिस्तानवर दीर्घकाळापासून आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड नेटवर्कसाठी वापर होणाऱ्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चवरून सवाल उपस्थित होत असल्याने ही कारवाई महत्त्वपूर्ण आहे.

तर पाकिस्तानची सायबर सुरक्षा यंत्रणा जागतिक स्तरावर धूळफेक करण्यासाठी अशाप्रकारची कारवाई करत असल्याचे मानले जाये. प्रत्यक्षात आयएसआयच सायबर फ्रॉड क्रिमिनलची एक टोळी चालविते, जी केवळ भारतच नव्हे तर जगभरात सायबर फ्रॉडच्या घटना घडवून आणते.

चीन कनेक्शनने वाढविली चिंता

या पूर्ण प्रकरणात महत्त्वपूर्ण पैलू चिनी नागरिकांचा सहभाग आहे. पाकिस्तानच्या यंत्रणेने चिनी नागरिकांना पकडण्यात आल्याची पुष्टी दिली आहे. दक्षिणपूर्व आशियातून समोर आलेल्या अनेक मोठ्या सायबर स्कॅम सेंटर्समध्ये चिनी नागरिक आणि संघटित गुन्हेगारी नेटवर्कची भूमिका तपासाचा विषय राहिल्याने हा पैलू महत्त्वाचा आहे. कंबोडियामध्ये मे महिन्यात एका कॅसिनोशी निगडित सायबर-स्कॅम ऑपरेशेनमध्ये 4 चिनी नागरिकांना मुख्य सूत्रधार म्हणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्या प्रकरणात सायबर फ्राडसमवेत मनी लॉन्ड्रिंग आणि अन्य गुन्ह्यांचे आरोपही होते.

पाकिस्तान ठरतोय केंद्र

पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉडसाठी नवे केंद्र ठरत असल्याचे चित्र आहे. मागील काही काणत पाकिस्तानात वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड नेटवर्क समोर आले आहेत. चालू महिन्यात कराची येथे एका आंतरराष्ट्रीय स्कॅम कॉल सेंटरप्रकरणी 27 जणांना अटक करण्यात आली होती. हे आरोपी स्वत:ला वित्तीय संस्थांचा अधिकृत प्रतिनिधी ठरवून विदेशात लोकांशी संपर्क साधाच्यो आणि त्यांची वित्तीय माहिती प्राप्त करायचे. तर ऑगस्ट महिन्यात इस्लामाबादमध्ये सायबर-रोमान्स नेटवर्कवर कारवाई करत 114 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. यात 111 चिनी तर 3 व्हिएतनामी नागरिक सामील होते. पाकिस्तानात बनावट कॉल सेंटर, ऑनलाइन रोमान्स फ्रॉड, फायनान्शियल स्कॅम, बनाटव ट्रेडिंग ऑफर आणि विदेशी नागरिकांना लक्ष्य करणारे डिजिटल नेटवर्क उभे राहिले आहे.

Advertisement
Tags :

.