पाक कसोटी संघाची घोषणा
इस्लामाबाद : इंग्लंड विरुद्ध मुल्तान येथे 7 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रिकेट कसोटीसाठी पीसीबीने पाक संघाची घोषणा केली असून या संघात जखमी खुर्रम शेहजादच्या जागी 37 वर्षीय फिरकी गोलंदाज नौमन अलीचा समावेश केला आहे. उभय संघात तीन समान्यांची ही कसोटी मालिका आयोजित केली आहे. नौमन अलीने आतापर्यंत 15 कसोटी सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व करताना 33.53 धावांच्या सरासरीने 47 बळी मिळविले आहेत. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना लंकेविरुद्ध कोलंबोत खेळताना 70 धावांत 7 गडी बाद केले होते. पाकमध्ये अलिकडेच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत पाक संघातून खेळणाऱ्या कमरान गुलाम आणि मोहम्मदअली यांना मात्र इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात वगळण्यात आले आहे. आयसीसीच्या विश्वकसोटी चॅम्पियनशीप गुणतक्त्यात पाकचा संघ सध्या आठव्या स्थानावर आहे. शान मसुदच्या नेतृत्वाखाली पाक संघाची या आगामी कसोटी मालिकेत सत्वपरीक्षा ठरेल.
पाक संघ: शान मसुद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), अमीर जमाल, अब्दुल्ला शफीक, अब्रार अहम्मद, बाबर अझम, मीर हमजा, मोहम्मद हुरेरा, मोहम्मद रिझवान, नसीम शहा, नौमन अली, सईम आयुब, सलमान आगा, सर्फराज अहम्मद, शाहीन आफ्रीदी.