For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तान संघाचे फिटनेस ट्रेनिंग ठरले चर्चेचा विषय

06:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तान संघाचे फिटनेस ट्रेनिंग ठरले चर्चेचा विषय
Advertisement

वृत्तसंस्था /लाहोर

Advertisement

आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी दोन महिन्याचा कालावधी राहिला आहे. अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच संघ तयारीला लागले आहेत. पाकिस्तानचा संघही मागे नाही. वर्ल्डकपआधी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड आणि इंग्लंडसोबत टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. अशा परिस्थितीत अबोटाबादमध्ये पाकिस्तानी संघाचे फिटनेस ट्रेनिंग सुरु आहे. दरम्यान, पाकिस्तानी टीमची ही फिटनेस ट्रेनिंग पद्धत सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. पाकिस्तान संघाच्या फिटनेस ट्रेनिंगमध्ये रस्सीखेच, दगड उचलून धावणे, डोंगर चढणे आणि बंदुकीतून गोळीबार करणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पाक संघाच्या फिटनेस ट्रेनिंग कँपमधील हे असे प्रशिक्षण पाहून क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. अशा प्रशिक्षणाचे काय फायदे होतील याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र हे प्रशिक्षण शिबिर सोशल मीडियावर आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.