For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला

06:07 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला
Advertisement

7 जणांचा मृत्यू : 75 जण जखमी : 6 पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूचा घेतला सूड

Advertisement

वृत्तसंस्था/ काबूल

अफगाणिस्तानच्या कूनार प्रांतात पाकिस्तानने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात कमीतकमी 7 जणांचा मृत्यू झाला असून 75 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यापीठाचे विद्यार्थी, मुले आणि सामान्य नागरिक सामील आहेत.

Advertisement

कुनार प्रांताची राजधानी असदाबाद येथील घरांसोबत सैयद जमालुद्दीन अफगाणी विद्यापीठाला पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आले आहे. तालिबान सरकारचे उपप्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी या हल्ल्यांकरता पाकिस्तानला जबाबदार ठरविले आहे. पाकिस्तानच्या सीमेतून सुरू झालेल्या हल्ल्यांमध्ये प्रारंभी मोर्टार आणि रॉकेट्स डागण्यात आले होते. तर दुसरीकडे पाकिस्ताने हे आरोप फेटाळले आहेत. विद्यापीठ आणि नागरी वस्तींना लक्ष्य करण्याचे वृत्त पूर्णपणे खोडसाळ असल्याचा दावा पाकिस्तानच्या सरकारने केला आहे.

पाकिस्तानच्या सैनिकांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या कंधार प्रांतात पाकिस्तानसोबतच्या सीमेवर पुन्हा हिंसक झटापट झाली होती. स्पिन बोल्डक भागात रविवारी रात्री अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात गोळीबार झाला होता. यात पाकिस्तानचे 6 सैनिक मारले गेले होते. तर तालिबानच्या सदस्यांनी एका पाकिस्तानी सैनिकाला ताब्यात घेत त्यांची शस्त्रास्त्रs स्वत:सोबत नेली होती.

मार्च महिन्यात संघर्षविराम

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात पूर्वीपासूनच तणाव आहे. पाकिस्तानने मार्च महिन्यात अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील एका नशामुक्ती केंद्रावर हल्ला केला होता, ज्यात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक देशांच्या मध्यस्थीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्षविराम झाला होता. परंतु आता पुन्हा स्थिती बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.