For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये पाकिस्तान

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये पाकिस्तान
Advertisement

आतापर्यंत 9 मुस्लीम देशांचे समर्थन : युरोपीय सहकारी इटलीने नाकारले निमंत्रण

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून स्थापन ‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये सामील होण्याचे मिळालेले निमंत्रण पाकिस्तानने अधिकृतपणे स्वीकारले आहे. ही संस्था मुख्यत्वे गाझामध्ये युद्धविराम लागू करणे आणि युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या क्षेत्राच्या पुनर्निर्मितीच्या देखरेखीसाठी स्थापन करण्यात आली आहे.  पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने वक्तव्य जारी करत पंतप्रधान शाहबाज शरीफ या बोर्डात सामील होणार असल्याची पुष्टी दिली. तर अमेरिकेचा युरोपीय सहकारी देश इटलीने या बोर्ड ऑफ पीसमध्ये सामील होण्यास नकार दिल्याने ट्रम्प यांना झटका बसला.

Advertisement

पाकिस्तानचे हे पाऊल संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव 2803 च्या अंतर्गत गाझा शांतता योजनेचे समर्थन करण्याच्या प्रयत्नांचा हिस्सा आहे. या व्यासपीठाद्वारे स्थायी युद्धविराम, मानवीय सहाय्यतेत वृद्धी आणि गाझाची पुनउ&भारणी सुनिश्चित होईल अशी अपेक्षा असल्याचे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तान 1967 च्या पूर्वीच्या सीमा आणि ‘अल-कुद्स अल-शरीफ’ला (जेरूसलेम) राजधानी मानून एक स्वतंत्र पॅलेस्टाइन देश स्थापन करण्याच्या बाजूने असल्याचे वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले.

काय आहे बोर्ड ऑफ पीस?

ट्रम्प यांनी सप्टेंबर महिन्यात गाझा युद्ध समाप्त करण्याच्या योजनेच्या अंतर्गत या बोर्डाचा प्रस्ताव मांडला होता. यात अनेक देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. बोर्डात स्थायी सदस्यत्वासाठी 1 अब्ज डॉलर्सच्या योगदानाची विनंती करण्यात आली आहे.

मुस्लीम देशांचे मोठे समर्थन

पाकिस्तानसोबत आतापर्यंत 9 मुस्लीमबहुल देश या बोर्डाचा हिस्सा होण्यावर सहमत झाले आहेत. यात गाझा मध्यस्थीत महत्त्वाची भूमिका बजावणारे कतार आणि तुर्किये सामील आहे. सौदी अरेबियाने बोर्ड ऑफ पीसमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले. सौदी अरेबिया, कतार, तुर्किये, इजिप्त, जॉर्डन, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरात या देशांनी याचे समर्थन पेले आहे. तर कुवैतने देखील स्वतंत्रपणे या बोर्डात सामील होणार असल्याची पुष्टी दिली आहे.

चीनकडून नकार

बोर्ड ऑफ पीसमध्ये सामील होण्याच्या अमेरिकेच्या आमंत्रणाला चीनने नाकारले आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या रक्षणासाठी चीन प्रतिबद्ध असल्याचे भारतातील चीनच्या दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांनी गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे. चीनला बोर्ड ऑफ पीसमध्ये सामील होण्यासाठी अमेरिकेचे आमंत्रण मिळाले. चीन नेहमीच बहुपक्षवादाचे पालन करत राहिला आहे. आंतरराष्ट्रीय स्थितीत कुठलाही बदल घडला, तरीही चीन संयुक्त राष्ट्रसंघाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या रक्षणासाठी प्रतिबद्ध असल्याचे यू जिंग यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.