पाकिस्तानकडे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षत्व
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
पाकिस्तानला मंगळवारपासून जुलै महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे अध्यक्षत्व मिळाले आहे. सुरक्षा परिषदेचे अध्यक्षत्व हे अस्थायी सदस्याच्या स्वरुपात पाकिस्तानच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा हिस्सा आहे. सुरक्षा परिषदेचे अध्यक्षत्व याच्या 15 सदस्य देशांदरम्यान अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये मासिक स्वरुपात बदलत राहते आणि याचक्रमात पाकिस्तानला सुरक्षा परिषदेचे अध्यक्षत्व मिळाले आहे.
पाकिस्तान या जबाबदारीला विनम्रतेने आणि दृढ विश्वासाच्या भावनेसह पार पाडणार आहे. आमचा दृष्टीकोन संयुक्त राष्ट्रसंघ चार्टरचे उद्देश अन् मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याच्या प्रतिबद्धतेवर आधारित राहणार असल्याचे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने सांगितले आहे.
पाकिस्तानचे अध्यक्षत्व पारदर्शक, सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणारे आणि उत्तरदायी असेल असे संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानचे राजदूत इफ्तिखार अहमद यांनी म्हटले आहे. जुलैमध्ये होणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या सर्व बैठकांचे अध्यक्षत्व राजदूत इफ्तिखार अहमद करणार आहेत. जगातील अवघड काळ, वाढती अस्थिरता, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठीचे धोके, वाढते संघर्ष आणि तीव्र मानवीय संकटांची पूर्ण जाणीव असल्याचे अहमद यांनी नमूद केले आहे.