For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानचे केवळ नाव, चीनकडून खरं काम

06:33 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानचे केवळ नाव  चीनकडून खरं काम
Advertisement

युद्धविरामासाठी जिनपिंग यांचा इराणवर दबाव

Advertisement

अमेरिका आणि इराणदरम्यान 2 आठवड्यांच्या युद्धविरामामागे चीनची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. चीनने पडद्यामागे राहून इराणला चर्चेसाठी तयार करण्यास मदत केली आहे. परंतु चीनने उघडपणे स्वत:ची भूमिका स्वीकार केली नाही. परंतु अनेक अहवालांमध्ये त्याच्या सक्रीय कूटनीतिक प्रयत्नांचा उल्लेख करण्यात आला आहे.

इराणला चर्चेच्या टेबलपर्यंत आणण्यात चीनची भूमिका राहिली असल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. या युद्धविरामाकरता चीनने मदत केल्याची माहिती मिळाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.

Advertisement

इराण हा चीनचा मोठा व्यापारी भागीदार असल्याने हे युद्ध लवकर संपुष्टात यावे आणि क्षेत्रात स्थिरता परतावी हे चीनसाठी आवश्यक होते. याचबरोबर ट्रम्प यांचा मे महिन्यात चीन दौरा प्रस्तावित आहे, जो युद्धामुळे टाळला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशास्थितीत चीन युद्ध थांबावे अशी चीनची इच्छा होती.

पडद्याआड चीनची कूटनीती

चीनने थेट समोर न येता शांततेच्या दिशेने काम केले आहे. चीनने पाकिस्तान, तुर्किये आणि इजिप्त च्या माध्यमातून इराणवर चर्चेसाठी दबाव टाकला होता. अमेरिका आणि इराणदरम्यान चर्चेची प्रक्रिया सुरू असताना चिनी अधिकारी सातत्याने इराणच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. अशाप्रकारे चीनने एक शांत परंतु प्रभावशाली भूमिका बजावल्याने दोन्ही देशांना चर्चेसाठी तयार करता येऊ शकले आहे. चीनने अधिकृतपणे स्वत:च्या भूमिकेवरून मोठे वक्तव्य केलेले नाही. परंतु वॉशिंग्टनमधील चीनच्या दूतावासाने चीन शांततेसाठी काम करत असल्याचे स्पष्ट केले होते.

संयुक्त राष्ट्रसंघातही दिसली भूमिका

चीनने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही स्वत:ची भूमिका स्पष्ट केली होती. चीनने रशियासोबत मिळून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत एका प्रस्तावावर नकाराधिकार वापरला होता. हा प्रस्ताव होर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी देशांच्या सहकार्याचे आवाहन करणारा होता. अमेरिका स्वत: मोठ्या हल्ल्यांची धमकी देत असताना हा प्रस्ताव मांडणे योग्य संदेश देत नसल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील चीनचे प्रतिनिधी फू कोंग यांनी म्हटले होते.

Advertisement
Tags :

.