For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपानमधील राजदूतामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय फजिती

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
जपानमधील राजदूतामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय फजिती
Advertisement

कावागोए : जपानच्या कावागोए शहरात निर्मित एका प्रार्थनास्थळामुळे पाकिस्तानी समुदायाच्या लोकांची फजिती झाली आहे. एप्रिल महिन्यात पाकिस्तानी राजदूत अब्दुल हमीद यांनी या प्रार्थनास्थळाचे उद्घाटन केले होते. परंतु हे प्रार्थनास्थळ आता जमीनदोस्त केले जाण्याची शक्यता आहे. या प्रार्थनास्थळाला बेकायदेशीर पणे निर्माण करण्यात आले होते असे स्थानिक अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.  प्रार्थनास्थळ प्रशासनाच्या अनुमतीशिवाय निर्माण करण्यात आले आहे. प्रार्थनास्थळ निर्मितीसाठी शहर नियोजन अधिनियमाच्या अंतर्गत विशेष परवाना आवश्यक असतो, जो मिळविण्यात आलेला नाही असे कावागोए सिटी हॉलने स्पष्ट केले आहे. यामुळे शहर प्रशासनाला आता हे प्रार्थनास्थळ हटविण्याची कारवाई करावी लागणार आहे.  या घटनेमुळे पाकिस्तानी दूतावासालाही अवघड स्थितीला तोंड द्यावे लागत आहे. वाद वाढल्यावर दूतावासाने या प्रकल्पापासून स्वत:ला वेगळे केले आहे. जपानच्या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कुठल्याही प्रकल्पाशी आमचा संबंध नसल्याचे पाकिस्तानच्या दूतावासाने वक्तव्य जारी करत म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.