For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकचा ऑस्ट्रेलियावर 22 धावांनी विजय

10:22 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकचा ऑस्ट्रेलियावर 22 धावांनी विजय
Advertisement

वृत्तसंस्था/लाहोर

Advertisement

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ सध्या पाकच्या दौऱ्यावर आला असून उभय संघात सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकने ऑस्ट्रेलियावर 22 धावांनी विजय मिळवित 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 22 चेंडूत 40 धावा व 29 धावांत 2 गडी बाद करणाऱ्या पाकच्या सईम आयुबला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 168 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 8 बाद 146 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 22 धावांनी गमवावा लागला.

पाकच्या डावामध्ये सलामीच्या सईम आयुबने 22 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 40, कर्णधार सलमान आगाने 27 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह 39, बाबर अझमने 20 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 24, फखर झमानने 1 चौकारासह 10, उस्मान खानने 2 चौकारांसह 18 तर मोहम्मद नवाजने 1 षटकारासह नाबाद 15 धावा जमविल्या. पाकच्या डावात 17 अवांतर धावा मिळाल्या. सईम आयुब आणि आगा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 46 चेंडूत 74 धावांची भागिदारी केली. पाकच्या डावात 8 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे अॅडम झाम्पाने 24 धावांत 4 तर बार्टलेट आणि बीयर्डमन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement

संक्षिप्त धावफलक

पाक 20 षटकांत 8 बाद 168 (सईम आयुब 40, सलमान आगा 39, बाबर अझम 24, उस्मान खान 18, मोहम्मद नवाज नाबाद 15, फखर झमान 10, अवांतर 17, झाम्पा 4-24, बार्टलेट व बीयर्डमन प्रत्येकी 2 बळी), ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 8 बाद 146 (ग्रीन 36, हेड 23, बार्टलेट नाबाद 34, रेनशॉ 15, जोश फिलीप 12, सईम आयुब व अब्रार अहमद प्रत्येकी 2 बळी, शदाब खान, मोहम्मद नवाज प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.