For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेगवान वादळात लॉर्ड्सवर पाकचा खुर्दा

06:56 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेगवान वादळात लॉर्ड्सवर पाकचा खुर्दा
Advertisement

इंग्लंडला 180 धावांची आघाडी, रॉबिन्सन, आर्चरचा भेदक मारा : ऑली रॉबिन्सन : 11 धावांत 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था, लंडन

ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीच्या वादळात पाकचा पहिल्या डावात केवळ 110 धावांत खुर्दा झाला. येथे सुरू असलेल्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दुसऱ्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने पाकला पहिल्या डावात 110 धावांत उखडले. इंग्लंडने या कसोटीत पहिल्या डावात पाकवर 180 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव 290 धावांत आटोपला होता.

Advertisement

या मालिकेत झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर पाकला मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिली कसोटी केवळ दोन दिवसांत आटोपली होती. त्याचीच पुनरावृत्ती लॉर्ड्सच्या दुसऱ्या सामन्यातही दिसत आहे. इमाम उल हक जखमी असल्याने या सामन्यातील उर्वरित भागात खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आले.

या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा जमविल्या. खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडने 9 बाद 248 धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी दुसऱ्या दिवशी खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांच्या शेवटच्या जोडीने 42 धावांची भर घातली. इंग्लंडच्या पहिल्या डावात जेमी स्मिथ आणि कॉक्स यांची समयोचित अर्धशतके तसेच अॅटकिनसन आणि टंग यांची उपयुक्त फलंदाजी महत्त्वाची ठरली. स्मिथने 80 चेंडूत 10 चौकारांसह 61, कॉक्सने 7 चौकारांसह 55, अॅटकिनसनने 6 चौकारांसह 45 तर टंगने 48 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद  30 धावा झळकविल्या. आर्चरने 14 धावा केल्या. इंग्लंडच्या डावात 24 अवांतर धावा मिळाल्या. पाकतर्फे मोहम्मद अब्बासने 4 तर मोहम्मद अलीने 3 आणि खुर्रम शहजाद व अली उस्मान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

इंग्लंडचा डाव आटोपल्यानंतर पाकने आपल्या पहिल्या डावाला प्रारंभ केला. इंग्लंडच्या आर्चर, रॉबिन्सन आणि टंग या वेगवान त्रिकुटासमोर पाकचे फलंदाज कोलमडले. पाकच्या पहिल्या डावात केवळ 2 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली.   सलामीच्या अझान अवैसने 102 चेंडूत 7 चौकारांसह 46 धावा जमविल्या तर साऊद शकीलने 16 चेंडूत 4 चौकारांसह 16 धावा केल्या. इमामुल हक दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही. उपाहारावेळी पाकची स्थिती 14.1 षटकांत 2 बाद 16 अशी होती.

खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पावसाचा अडथळा आल्याने काहीवेळ खेळ थांबवावा लागला. पाकची स्थिती 28 षटकांत 4 बाद 81 धावा असताना पावसामुळे खेळात व्यत्यय आला. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाली आणि इंंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर पाकचे शेवटचे 6 फलंदाज 29 धावांत बाद झाले. चहापानावेळी पाकचा पहिला डाव 37.2 षटकांत 110 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडतर्फे रॉबिनसनने 11 धावांत 4, आर्चरने 26 धावांत 3 तर टंगने 27 धावांत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक: इंग्लंड प. डाव 66.4 षटकांत सर्वबाद 290 (स्मिथ 61, कॉक्स 55, अॅटकिनसन 45, टंग नाबाद 30, ब्रुक 15, डकेट 17, आर्चर 14, लॉरेन्स 17, अवांतर 24, मोहम्मद अब्बास 4-73, मोहम्मद अली 3-86, खुर्रम शहजाद व अली उस्मान प्रत्येकी 1 बळी), पाक प. डाव 37.2 षटकांत सर्वबाद 110 (अझान अवैस 43, सौद शकील 16, अवांतर 20, रॉबिन्सन 4-11, आर्चर 3-26, टंग 2-27).

Advertisement
Tags :

.