पाक क्रिकेट संघाला दंड
वृत्तसंस्था / केप टाऊन
द. आफ्रिका संघाविरुद्ध येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात षटकांची गती राखता न आल्याने पाक क्रिकेट संघाला दंड करण्यात आला आहे. दोन सामन्यांची ही कसोटी मालिका यजमान द. आफ्रिकेने एकतर्फी जिंकून आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
या दुसऱ्या कसोटी सामन्यात निर्धारीत वेळेत पाकच्या गोलंदाजांना षटकांची गती राखता आली नाही. त्यांना निर्धारीत वेळेपेक्षा अधिक कालावधी 5 षटके टाकण्यासाठी लागल्याने आयसीसी इलाईट पॅनेलचे सामना अधिकारी रिची रिचर्डसन यांनी दंड करण्याचा निर्णय घेतला. पाक संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येक षटकामागे त्याला मिळणाऱ्या मानधन रक्केतील 5 टक्के रक्कम दंड म्हणून केला आहे. यामुळे आता पाक संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधन रक्केतील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल. या गुन्ह्dयामुळे विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत पाक संघाने 5 गुण गमविले आहेत. पाकचा कर्णधार शान मसुदने गुन्ह्dयाची कबुली दिल्याने आयसीसीच्या चौकशी समितीसमोर सुनावणीची गरज नसल्याचे सांगण्यात आले. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत द. आफ्रिकेकडून पाकला फॉलोऑन स्वीकारावा लागला होता.