महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाक-बांगलादेश पहिली कसोटी आजपासून

06:55 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / रावळपिंडी

Advertisement

यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. अनुभवी अष्टपैलु शकिब अल हसनच्या कामगिरीवरच बांगलादेशची भिस्त राहिल.

Advertisement

या मालिकेसाठी बांगलादेशचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतो याच्याकडे सोपविण्यात आले आहे. रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडीयमवर बुधवारपासून पहिल्या क्रिकेट कसोटीला प्रारंभ होत असून या मालिकेसाठी बांगलादेश संघाने कसून सराव केला आहे. या मालिकेत अनुभवी शकिब अल हसन याची कामगिरी महत्वाची ठरेल कारण त्याला व्यावसायिक क्रिकेट क्षेत्राचा अनुभव बऱ्याच वर्षांचा असल्याने तो या मालिकेत दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास कर्णधार नजमुल हुसेन शांतोने क्यक्त केला आहे. बांगलादेश संघातील शकिब अल हसन हा सर्वात महत्वाचा अष्टपैलु खेळाडू आहे. शकिबची फिरकी या मालिकेत निर्णायक ठरु शकेल. मध्यंतरी कॅनडामध्ये टी-20 लीग स्पर्धेत शकिब अल हसनने आपला सहभाग दर्शविला होता. बांगलादेशमधील राजकीय तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने शकिबने काही दिवस कॅनडामध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो या मालिकेसाठी पुन्हा बांगलादेश संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे.

बांगलादेशमधील हिंसक घटनांमुळे संघाला सराव पुरेसा करता आला नाही. त्यमुळे बांगलादेश संघाने या मालिकेपूर्वीच चार दिवस आधी पाकला प्रयाण केले. त्यामुळे त्यांना तीन दिवस सराव करण्याची संधी लाहोरमध्ये मिळाली. या मालिकेतील दोन्ही सामने रावळपिंडीतच खेळविले जाणार आहेत. सदर मालिका ही आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत आहे. या स्पर्धेच्या मानांकनांत पाकिस्तान सध्या सहाव्या तर बांगलादेश आठव्या स्थानावर आहे. विंडीजचा संघ या मानांकनात नवव्या स्थानावर आहे. आतापर्यंत या दोन देशांमधील झालेल्या कसोटी मालिकेतील कामगिरीचा विचार केल्यास पाकची कामगिरी बांगलादेशच्यातुलनेत अधिक सरस झाली आहे. उभय संघामध्ये आतापर्यंत 13 कसोटी सामने झाले असून त्यापैकी 12 सामने पाकने तर केवळ एक सामना बांगलादेशने जिंकला आहे. 2015 साली बांगलादेशमध्ये झालेला सामना अनिर्णित राहिला होता. चार वर्षांपूर्वी बांगलादेशचा संघ पाकमध्ये मालिका खेळण्यासाठी आला होता आणि रावळपिंडीत झालेल्या सामन्यात शहाने नोंदविलेल्याने हॅट्ट्रीकच्या जोरावर पाकने बांगलादेशचा एक डाव आणि 44 धावांनी पराभव केला होता याची आठवण कर्णधार शांतोने करुन दिली. या हॅट्ट्रीकमध्ये शहाने शांतोलाही बाद केले होते.

पाकमध्ये बुधवारपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी निवडण्यात आलेला बांगलादेशचा संघ निश्चितच समतोल आहे. पाक संघाला ऑस्ट्रेलियाचे जेसन गिलेस्पी हे नवे प्रमुख प्रशिक्षक लाभले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाकचा हा पहिला कसोटी सामना राहिल. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. शाहीन आफ्रिदी, खुर्रम शेहजाद आणि मोहम्मद अली हे पाक संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. रावळपिंडीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला सुरुवातीला अनुकुल राहिल, असा अंदाज असून नाणेफेकीचा कौल या सामन्यात महत्वाचा ठरेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article