पाकिस्तानी सैन्याने बदलला न्युक्लियर अलर्ट
भारतीय सैन्याच्या कारवाईची धास्ती : उपग्रहीय छायाचित्रांद्वारे खुलासा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारतान पीओकेवरून मोदी सरकारची आक्रमक भूमिका पाहून पाकिस्तानी सैन्यात धास्ती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या या भीतीचा खुलासा आता उपग्रहीय छायाचित्रांद्वारे झाला आहे. पाकिस्तानच्या सैन्याने स्वत:च्या आण्विक अलर्टच्या स्तरावर बदल केला असल्याचे उपग्रहीय छायाचित्रांद्वारे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान आता पर्वतांच्या आत साइलोंची निर्मिती करत आहे. भारताकडून हल्ला करण्यात आल्यास अण्वस्त्रं सुरक्षित रहावीत याकरता हे पाऊल उचलण्यात आले आहे. याचबरोबर पाकिस्तान प्रथम अण्वस्त्रहल्ला करत असल्यास त्याची गोपनीयता कायम रहावी याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. अण्वस्त्रासंबंधी नो फर्स्ट युजच्या धोरणाचे पालन करत नसल्याचे पाकिस्तानने अलिकडेच स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान अण्वस्त्रांच्या सेंसरद्वारे त्यांचा शोध घेता येऊ नये म्हणून साइलो निर्माण करत आहे. या नव्या साइलोंना भूमिगत लाँच सुविधा केंद्र नाव देण्यात आले आहे. यातून पाकिस्तानच्या स्टॅटेजिक प्लॅन्स डिव्हिजनने स्वत:च्या आण्विक भूमिका आणि युद्धाचे डिझाइन बदलले आहे. याच्या अंतर्गत दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना न्युक्लियर फर्स्ट यूज स्ट्रॅटेजीमध्ये सामील करण्यात आल्याचे उपग्रहीय छायाचित्रांच्या विश्लेषणाचे तज्ञ विनायक भट्ट यांनी सांगितले आहे.
पाकिस्तानच्या आण्विक तळांवर मोठी तयारी
पाकिस्तानने कराची आणि हैदराबाद शहरांमध्ये असलेल्या आण्विक सुविधा केंद्रांमध्ये विशेष अलर्ट झोनतयार केले असून तेथे दुहेरी कुंपण उभारण्यात आले आहे. पाकिस्तानच्या न्युक्लियर स्टेट्समध्ये मोठा बदल करण्यात आल्याचे यातून स्पष्ट होते. पाकिस्तानने आण्विक तळांच्या संरचनामध्ये शिरण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या भुयारांच्या बाहेर क्राँक्रिटचे आच्छादन, स्टील प्लेट्स लावली आहेत. कुठल्याही स्थितीत भारतीय सैन्याच्या हल्ल्यापासून स्वत:ची अण्वस्त्रs वाचविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे.
पाकिस्तानकडे 170 हून अधिक अण्वस्त्रs आहेत. पाकिस्तानने टॅक्टिकल अणुबॉम्ब तयार करण्यास यश मिळविल्याचे काही तज्ञांचे मानणे आहे. या अण्वस्त्रांना आकाश, पाणी आणि जमिनीवरून डागण्यासाठी पाकिस्तानने घौरी, गझनवी यासारखी अनेक क्षेपणास्त्रs आणि मिराज तसेच जेएफ-17 यासारखी लढाऊ विमाने तैनात केली आहेत.