For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाक-अफगाण शांतता चर्चा निष्फळ

07:00 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाक अफगाण शांतता चर्चा निष्फळ
Advertisement

मध्यस्थ तुर्कियेने प्रकियेतून घेतली माघार

Advertisement

वृत्तसंस्था/अंकारा

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध तणावपूर्ण असून दोन्ही देशांनी परस्परांवर बॉम्बफेकही केली आहे. दोन्ही देशांदरम्यान युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्यावर मध्यपूर्वेच्या अनेक देशांनी मध्यस्थीसाठी धाव घेतली, परंतु कुणालाच यश मिळू शकलेले नाही. दोन्ही देशांच्या बिघडत्या संबंधांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या तुर्कियेने आता या प्रक्रियेतून पूर्णपणे माघार घेतली आहे. वारंवार प्रयत्न करूनही पाक आणि अफगाणिस्तानातील टोकाचे मतभेद दूर न झाल्याने तुर्कियेने स्वत:ची भूमिका समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

तुर्कियेच्या नेतृत्वात, कतार आणि सौदी अरेबियाच्या भागीदारीसह अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा झाली, परंतु कुठलाच निष्कर्ष निघू शकलेला नाही. पाकिस्तानच्या अटींना अवैध ठरवत अफगाणिस्तानने व्यापक शांतता कराराच्या कुठल्याही चौकटीला मान्य करण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या सुरक्षा मागण्या मान्य करण्यास अफगाण तयार नसल्याचे तुर्कियेने कळविले आहे.

पाकिस्तानकडून तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)च्या दहशतवाद्यांना सोपविणे, डूरंड रेषेसोबत 5 किलोमीटरचा बफर झोन निर्माण करणे, अफगाण ट्रान्झिट ट्रेड आणि मालवाहतुकीवर कठोर देखरेख, पाकिस्तानात राहत असलेल्या अफगाण शरणार्थींची त्वरित वापसी यासारख्या अटी मांडण्यात आल्या होत्या. अफगाण प्रशासनाने या अटी मान्य करयणस नकार देत हा प्रकार अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला असल्याचे सुनावले आहे.

कतारबद्दल नाराजी, सौदीकडून अपेक्षा

कुठल्याही दबाव आधारित व्यवस्थेला स्वीकार करणार नसल्याचे अफगाणिस्तानने तुर्किये, कतार आणि सौदी अरेबियाला कळविले आहे. तुर्कियेच्या सातत्याने कूटनीतिक समर्थनानंतरही पाकिस्तानला अफगाणिस्तानकडून कुठलीच लेखी सुरक्षा हमी प्राप्त करता आलेली नाही. तर मध्यस्थी करणाऱ्या देशांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. पाकिस्तानी प्रतिनिधींनी कतारविषयी अविश्वास व्यक्त केला. कतार आता अफगाणिस्तान-तालिबानला झुकते माप देत असल्याचा  आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तान आता सौदी अरेबियाला दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी अखेरचा विश्वासार्ह स्रोत मानत आहे.

Advertisement
Tags :

.