पद्मावती प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : श्री पद्मावती स्पोर्ट्स क्लब आयोजित जैन समाज मर्यादित पहिल्या पद्मावती प्रीमियर लीग प्रकाश झेतातील दिवस-रात्रीच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला मोट्या उत्साहात प्रारंभ झाला. युनियन जिमखाना मैदानावरती आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे अनिल बेनके, नागराज पाटील, शितल शेट्टी, गंगाधर पाटील, सागर सोलापूरे, सुकुमार पद्मण्णवर, सचिन कुडची, महावीर सोलापूरे, प्रसन्ना शेट्टी संतोष बटगेर, दर्शन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
जैन समाजातर्फे प्रथमच दिवस-रात्र प्रकाश झोतातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्याला अंकित मुदकणवर, यांच्यातर्फे 55,555 व आकर्षक चषक तर उपविजेत्याला 33,333 हजार ऊपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीरासाठी जैन युवक मंडळातर्फे बक्षीस सायकली देण्यात येणार आहेत. तर प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी दर्शन राऊत यांच्याकडून सामनावीर पुरस्कार देण्यात येणार आहे.