महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केरळमध्ये पद्मश्री पुरस्कार विजेत्याला अटक

06:33 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आर्थिक फसवणुकीची तक्रार : पोलिसांकडून कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ त्रिशूर

Advertisement

केरळमधील व्यावसायिक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुंदर सी. मेनन यांना त्रिशूर येथे कथित आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. मेनन यांना राज्य पोलिसांच्या जिल्हा गुन्हे शाखेने अटक केली असून स्थानिक न्यायालयात हजर केल्यावर जिल्हा कारागृहात हलविण्यात आले आहे.

2016 मध्ये नागरी पुरस्कार मिळविणाऱ्या मेनन यांच्यावर दोन कंपन्यांच्या नावाखाली लोकांकडून ठेवी स्वीकारण्यासंबंधी आर्थिक फसवणुकीचे 18 गुन्हे नोंद आहेत. या कंपन्यांच्या संचालकांमध्ये मेनन यांचा समावेश होता. मेनन यांनी विविध लोकांकडून कथित स्वरुपात 7.78 कोटी रुपये स्वीकारले, परंतु योजनांची मुदत संपल्यावर पैसे परत केले नसल्याचा आरोप आहे.

आरोपीने 62 हून अधिक गुंतवणुकदारांकडून ठेवी स्वीकारत फसवणूक केली. तसेच आरबीआयच्या मापदंडांचे उल्लंघन केले. संबंधित ठेवींची मुदत संपल्यावर रक्कम परत न करत गुंतवणुकदारांची त्यांनी फसवणूक केल्याचे पोलिसांकडून म्हटले गेले.

आरोपी विरोधात 18 गुन्हे नोंद असून या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशी सोपविण्यात आली होती. बीयूडीएस (अनियमित ठेवयोजनांवर बंदी) अधिनियम अंतर्गत मेनन आणि कंपनीच्या अन्य संचालकांची संपत्ती जप्त करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 63 मेनन हे प्रसिद्ध त्रिशूर पूरमच्या आयोजकांपैकी एक आहेत. तसेच ते तिरुवम्बाडी देवस्थानमचे अध्यक्ष देखील होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article