महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बजरंग पुनियाकडून पद्मश्री पुरस्कार परत

06:25 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुस्ती संघटना अध्यक्ष निवडीच्या निषेधार्थ मोठे पाऊल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारतीय कुस्ती महासंघाचे नवे प्रमुख संजय सिंह यांच्या निवडीच्या निषेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती दिली. बजरंगने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्म पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. या पत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना ‘मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. आपल्याला माहिती देण्यासाठी हे माझे पत्र असून तेच माझे स्पष्ट मत आहे’, असे पुनिया याने लिहिले आहे.

भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत गुऊवारी ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी बाजी मारली. संजय सिंह यांच्या पॅनेलने 15 पैकी 13 पदे जिंकून भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. संजय सिंह यांनी निवडणूक जिंकल्यानंतर साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी साक्षीने कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापाठोपाठ आता बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे.

पंतप्रधानांना भावनिक पत्र

बजरंग पुनिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात भावनिक विचार मांडलेले दिसून येत आहेत. ‘माननीय पंतप्रधान, मला आशा आहे की तुम्ही निरोगी असाल. तुम्ही देशाच्या सेवेत व्यस्त असाल. तुमच्या प्रचंड व्यस्ततेत, मला तुमचे लक्ष आमच्या कुस्तीकडे वेधायचे आहे. यावषी जानेवारी महिन्यात देशातील महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे प्रभारी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते, तेव्हा त्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले तेव्हा मीही त्यात सामील झालो होतो. सरकारने ठोस कारवाई करण्याचे सांगितल्यावर आंदोलक कुस्तीपटू जानेवारीत आपापल्या घरी परतले. पण तीन महिने उलटूनही जेव्हा ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला नाही, तेव्हा एप्रिल महिन्यात आम्ही कुस्तीपटूंनी पुन्हा रस्त्यावर उतरून दिल्ली पोलिसांनी किमान ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर नोंदवावा म्हणून आंदोलन केले, पण तरीही काही कार्यवाही झाली नाही. अखेरीस आम्हाला न्यायालयात जावे लागले. याचदरम्यान ताकदीच्या जोरावर ब्रिजभूषण सिंह यांनी आमच्याविरोधात दंड थोपटले. आम्हा सर्वांवर खूप दबाव होता. आमच्या निषेधस्थळाची तोडफोड करण्यात आली. जेव्हा हे घडले तेव्हा आम्हाला काय करावे हे सुचत नव्हते. त्याचवेळी एका जबाबदार मंत्र्याने फोन करून तुम्हाला न्याय दिला जाईल, असे सांगितले. गृहमंत्र्यांचीही भेट घेतली. त्यांचा सल्ला आम्ही मान्य करून रस्त्यावरील आमचे आंदोलन संपवले. मात्र 21 डिसेंबर रोजी झालेल्या कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांचाच गट पुन्हा एकदा विजयी झाला आहे. या सर्व प्रकाराबाबत आपण दु:खी असल्याचे बजरंगने पत्रात नमूद केले आहे.

काय आहे प्रकरण?

यावषी जानेवारी महिन्यात बजरंग पुनियासह देशातील अनेक बड्या कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले होते. ब्रिजभूषण सिंग आणि त्यांच्या समर्थकांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण आणि मनमानी केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला होता. यानंतर तपासाचे आश्वासन मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले होते. शेवटी ब्रिजभूषण पायउतार झाल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या. डब्ल्यूएफआयच्या निवडणुकीची प्रक्रिया जुलैमध्येच सुरू झाली होती, परंतु प्रकरण न्यायालयात गेल्याने त्याला विलंब झाला. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने घातलेल्या निवडणुकीवरील बंदी नाकारल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. गुरुवारीच निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयाच्या पॅनेलने त्यात बाजी मारली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article