For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाडलोस रवळनाथ पंचायतनचा 26 रोजी जत्रोत्सव

01:10 PM Nov 21, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पाडलोस रवळनाथ पंचायतनचा 26 रोजी जत्रोत्सव
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनाचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार 26 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांसाठी दिवसभर विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जत्रोत्सवानिमित्त सकाळी देवतांवर महाआभिषेक, समाराधना, ओटी भरणे, केळी ठेवणे तसेच नवस बोलणे व फेडणे या धार्मिक सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री 1 वा. आजगावकर दशावतार नाट्यमंडळचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन पाडलोस ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.