For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोपर्डे हवेली परिसरात भातरोपे लावणीस सुरुवात

04:19 PM Jul 12, 2025 IST | Radhika Patil
कोपर्डे हवेली परिसरात भातरोपे लावणीस सुरुवात
Advertisement

मसूर :

Advertisement

सध्या भात रोपे लावणीस वातवरण पोषक असल्याने आणि भाताच्या तरावाचा कालावधी पूर्ण झाल्याने कोपर्डे हवेली परिसरात भात रोपाच्या लावणीस सुरुवात झाली आहे. कोपर्डे हवेली परिसर हा भात उत्पादनाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकरी वाफे तयार करून भात टाकून रोपे तयार करतात. जमिनीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करतात. त्यानंतर शेतात पाणी साचण्यासाठी उपायोजना करुन भाताची रोपे लावतात.

सध्या पाऊस पडत असल्याने भात रोपाच्या लावणीस वातवरण पोषक असल्याने आणि तराव लावण्याचे दिवस भरल्याने शेतकरी रोपाची लावण करत असल्याचे चित्र सध्या कोपर्डे हवेलीत दिसून येत आहे. शिवारे शेतकऱ्यांनी गजबजून गेली आहेत. कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, पार्ले, बनवडी, नडशी, शिरवडे, सैदापूर आदी गावात मजुरांच्या सहाय्याने भात रोपांच्या लावणीस सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामात मे महिन्यात पावसाने सुरुवात केली.

Advertisement

सतत पाऊस पडल्याने अनेकांची तरवे वाया गेली असल्याने भात तरावाची टंचाई जाणवू शकते. आम्ही स्वतः भाताची रोपे तयार करतो. मातीची चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने लावणी करतो. शिल्लक भाताच्या तरावाची विक्री करतो. रोपांचा खर्च निघून जातो, असे येथील शेतकरी विक्रम चव्हाण यांनी सांगितले.

  • पाण्याची व्यवस्था

भात रोपांची लावणी करताना शेतात पाणी साचून राहण्यासाठी चारी बाजूंनी बांध घातले जातात. पाणी असेल तरच लावण करता येते. सध्या पाऊस असल्याने लावणी सुरू आहेत. ज्यांच्या शेतात पाणी साचत नाही त्यांनी कृषी पंपाच्या साहाय्याने शेतात पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे.

Advertisement
Tags :

.