महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

परतीच्या पावसामुळे भातसुगी-ऊसतोडणी लांबणीवर

10:41 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर तालुक्यातील चित्र : वीट उत्पादनाला उशिरा सुरुवात होणार : वातावरणाची साथ मिळणे गरजेचे : सध्या भातमळणी जोमाने

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्मयात यावर्षी परतीच्या पावसामुळे भातकापणी, ऊसतोडणी लांबणीवर पडली. गेल्या दोन दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने शेतकरी भात कापणीच्या गडबडीत आहेत. ऊस तोडणीही लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच वीट उत्पादनालाही उशिरा सुरवात होणार असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीपासून विटाना म्हणावी तशी मागणी नसल्याने वीट उत्पादकही चिंतेत आहे. एकूणच तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि वीट व्यावसायिक चिंतेत आहेत. पुढील चार महिने शेतकऱ्यासह वीट उत्पादकांना निसर्गाने साथ देणे गरजेचे आहे. गेल्या दोन दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने ग्रामीण भागात भात कापणीला सुरवात झाली.

Advertisement

त्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकरी भात कापून मळणी करून घरी आणण्याच्या लगबगीत आहेत. काही ठिकाणी ऊसतोडणी कामगारांकडून भात कापून घेण्यात येत आहे. परतीचा पाऊस झाल्याने ऊसतोडणी लांबणीवर गेली आहे. अशातच महाराष्ट्रातील निवडणुकीचा परिणाम ऊस तोडणीवर झाला आहे. महाराष्ट्रातील ऊस कारखान्यानी अद्याप आपल्या टोळ्या आणि ट्रक पाठवलेले नाहीत. त्यामुळे ऊस तोडणीही लांबण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. खानापूर साखर कारखान्यानेही अद्याप आपल्या गळीत हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. परतीच्या पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माळरानावरील आणि पाणथळ जमिनीतील भातकापणी एकदमच आल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता भासत आहे.

वीट व्यावसायिक संभ्रमात

खानापूर तालुक्मयातील मातीपासून भांडी तसेच इतर साहित्यही निर्माण केले जाते. बांधकामासाठी लागणाऱ्या भाजीव विटांसाठी खानापूर तालुका प्रसिद्ध आहे. जोडधंदा म्हणून तालुक्यातील शेतकरी वीट उत्पादन करतात. या विटाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र गेल्या वर्षीपासून विटांची मागणी घटल्याने वीट उत्पादकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. मागील वर्षी उत्पादन केलेल्या विटांची उचल अद्याप झाली नसल्याने वीट व्यावसायिकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. अशातच यावर्षीच्या वीट उत्पादनाचा हंगामही तेंडावर आल्याने वीट व्यावसायिक संभ्रमात सापडला आहे. तालुक्यात गर्लगुंजी, निट्टूर, इदलहोंड, गणेबैल, गंगवाळी, सावरगाळी, गुंजी, किरावळे, कामतगा, माणिकवाडी, भालके, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, चापगाव, शिवोली, हलगा, तोपिनकट्टी, बरगाव, गर्बेनहट्टी, बस्तवाड यासह इतर गावातूनही विटांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. काही व्यावसायिक मोठ्या प्रमाणात वीट उत्पादन करतात.

वीट व्यावसायिक आर्थिक संकटात

या वीट उत्पादनाच्या व्यवसायासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार दिला जातो. यासाठी हल्याळ, धारवाड, गोकाक, यमकनमर्डी, अळणावर यासह इतर ठिकाणाहून हजारो वीट कामगार दरवषी खानापूर तालुक्मयात येतात. त्यामुळे त्यांना रोजगार मिळतो. वीट व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. बाजारपेठाही फुलल्या जातात. मात्र गेल्या वर्षीपासून विटांची उचल होत नसल्याने बाजारपेठेवरही परिणाम दिसून येत आहे. वीट व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची आर्थिक गती मंदावली आहे. अशातच अवकाळी पावसानेही जोर केल्याने शेतकऱ्यासमोर अस्मानी संकट उभारले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article