पावसाने पाठ फिरवल्याने भातशेती संकटात
जिल्ह्यात उत्पादन निम्म्यावर येण्याची भीती : चाऱ्यासाठी पीक कापण्याची वेळ
प्रतिनिधी/ बेळगाव
मुबलक उत्पादनाची अपेक्षा असलेल्या भातशेतीला यंदा पावसाच्या कमतरतेचा मोठा फटका बसला आहे. भाताला लोंब येण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात पाण्याअभावी पिके कोमेजू लागली असून अनेक शेतांमध्ये भाताची रोपे सुकून गेली आहेत. त्यामुळे यंदा भाताच्या उत्पादनात 50 टक्क्मयांहून अधिक घट होण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी पीक वाचण्याची शक्मयता नसल्याने शेतकरी भात चाऱ्यासाठी कापत असून काहींनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पीक नष्ट करण्यास सुऊवात केली आहे.
जिल्ह्यात सुमारे 57 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. त्यापैकी सुमारे 15 हजार हेक्टरवर बासमतीची लागवड होते. बेळगावचा बासमती, इंद्रायणी, तसेच इतर भाताच्या वाणांना कर्नाटकासह गोवा व महाराष्ट्रातही मोठी मागणी आहे. त्यामुळे भात हे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी व अन्नधान्य पीक मानले जाते. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर व उत्पन्नावर मोठे संकट ओढवले आहे.
धामणे, वडगाव, सुळगे, हलगा, शहापूर, बस्तवाड, मजगाव, मच्छे, अनगोळ, देसूर, बसवनकुडची, निलजी, कडोली, देवगिरी, जाफरवाडी यासह खानापूर तालुक्मयातील अनेक भागांत भाताची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जून-जुलैमध्ये लागवड केलेल्या भाताला सध्या लोंब येण्याची अवस्था आहे. या काळात पिकाला पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. मात्र गेल्या महिनाभरापासून अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतातील पाणी आटले असून भातपिके सुकू लागली आहेत.
सामान्य परिस्थितीत प्रतिएकर 20 ते 25 क्विंटल किंवा त्याहून अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा 10 क्विंटल उत्पादन मिळणेही कठीण आहे. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना कूपनलिका किंवा अन्य माध्यमांतून काही प्रमाणात पाणी उपलब्ध होत असले तरी भूजलपातळी खालावल्यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अगसगा, अनगोळ व परिसरातील भातशेतीची परिस्थिती गंभीर झाली आहे. पाण्याअभावी पिके सुकल्याने काही शेतकरी भात कापून जनावरांसाठी चारा म्हणून वापरत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी वाळलेले पीक ट्रॅक्टरच्या साहाय्याने नष्ट केले आहे. वर्षभराच्या उत्पन्नाची आशा असलेले पीक डोळ्यासमोर वाया जात असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
भात लागवडीसाठी प्रतिएकर सुमारे 20 ते 30 हजार ऊपये खर्च येतो. पावसाच्या कमतरतेमुळे हा खर्चही वाया जाण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. सप्टेंबरमध्ये सुऊवातीला काही भागात रिमझिम पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने अचानक उघडीप दिली. त्यातच वाढलेला सूर्यप्रकाश व उष्णतेमुळे शेतातील ओलावा झपाट्याने कमी झाला.
यंदा जिल्ह्यात मान्सून पाऊस सुमारे 39 टक्क्मयांनी कमी झाल्याचा परिणाम भातशेतीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणावर सुकत असून सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनाही मर्यादित पाणीसाठ्यामुळे अडचणी येत आहेत. कृषी विभागामार्फत भात पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेऊन शासनाने भात उत्पादकांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे.