For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम करवीरमध्ये उत्स्फुर्तपणे मतदान ! कोगे, पाडळी खुर्द, कसबा बीड, शिरोली दुमालामध्ये मतदारांमध्य़े

06:12 PM May 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
पश्चिम करवीरमध्ये उत्स्फुर्तपणे मतदान   कोगे  पाडळी खुर्द  कसबा बीड  शिरोली दुमालामध्ये मतदारांमध्य़े
Kasba Beed
Advertisement

काही ठिकाणी चुरस व वाढणारा टक्का कोणाला?कोण होणार विजयी हे ठरवणार मतदार

कसबा बीड तालुका करवीर या परिसरातील पाडळी खुर्द ,कोगे ,महे , कसबा बीड , शिरोली दुमाला आदी गावामध्ये दुपारी तीन पर्यंत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 65 टक्के मतदान पूर्ण झाले. आहे.अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीकडून कोल्हापूर जिल्ह्याचे राजश्री शाहू महाराज छत्रपती तर महायुतीच्या आघाडीकडून संजय मंडलिक यांच्या लोकसभा निवडणुकीचे मतदान होत आहे.यामध्ये पाडळी खुर्द येथे एकूण मतदान 4266 व 5 वॉर्ड,कोगे येथे एकूण मतदान 4021,येथे एकूण मतदान 2468 व 2 वॉर्ड,कसबा बीड येथे 3130 एकूण मतदान व 3 वार्ड,शिरोली दुमाला येथे 4509 एकूण मतदान व 4 वॉर्ड आहेत.सकाळच्या प्रहरी ज्येष्ठ नागरिकांचा मतदान करण्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.यामध्ये युवकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी प्राधान्य दिले होते.

Advertisement

कोगे येथे ज्येष्ठ नागरिकांबरोबर दिव्यांग असणारा नवीन मतदार पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रसाद विश्वनाथ मोरे यांनी मतदान केले, तसेच जेष्ठ नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला.

महे येथे सरपंच एस.डी. जरग व ग्रामपंचायत सदस्य यांनी निवडणूक आयोगाने दिलेला नवीन उपक्रम अत्यंत दिमागदार स्वरूपात राबवला.यामध्ये हिरकणी कक्ष,मी मतदार म्हणून सेल्फी पॉइंट,पाळणाघर,सेंद्रिय शेती,आरोग्य विभागाकडून प्रथमोपचार केंद्र,अपंगांसाठी व ज्येष्ठांसाठी मतदान करण्यासाठी केलेली वेगळी व्यवस्था,असा विविध उपक्रम राबवल्याने मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.ज्येष्ठ नागरिकांमध्ये धोंडीराम महादेव पाटील,अंबाबाई बाळू हुजरे, व नविन मतदार आदींनी मतदान केले.

Advertisement

शिरोली दुमाला येथे गोकुळचे संचालक व माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, निवृत्ती संघाचे चेअरमन व सरपंच सचिन पाटील, प्रथमच साक्षी दिलीप कुमार पाटील या युवतीने आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी मतदान केले. एकंदरीत उत्स्फूर्तपणे कसबा बीड परिसरामध्ये दुपारी तीन पर्यंत 65 % मतदान शांततेत सुरू आहे

Advertisement
Tags :

.