For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचगाव ग्रामसभेत रडा...एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार; सरपंच, ग्रामसेवकांवर प्रश्नांचा भडीमार

06:44 PM Jan 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
पाचगाव ग्रामसभेत रडा   एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार  सरपंच  ग्रामसेवकांवर प्रश्नांचा भडीमार
Pachgoan
Advertisement

पाचगाव वार्ताहर
शुक्रवारी पाचगाव येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवकांवर प्रश्नांचा भडीमार केला. ग्रामसभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यामुळे शेवटी पोलीस बंदोबस्तात सभा पार पडली. 26 जानेवारी रोजी पाचगाव येथील ग्रामसभा ग्रामपंचायतला लागून असलेल्या पंचालेश्वर महादेव मंदिराच्या हॉलमध्ये सकाळी बारा वाजता सुरू झाली. या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पाचगाव च्या सरपंच प्रियंका संग्राम पाटील होत्या.

Advertisement

ग्रामसभेमध्ये पंकज कांबळे यांनी आंबेडकर कमान येथील दलित वस्तीमध्ये गेल्या वीस वर्षात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाहीत असे सांगत या भागात रस्ते, गटर यांची सुविधा देण्यात यावी अशी मागणी केली. पाचगाव परिसरातील सर्व ओपन स्पेस ग्रामपंचायतीने तात्काळ आपल्या ताब्यात घ्यावेत अशी मागणी हेमंत चिले यांनी केली.

पाचगाव परिसरात अनेक ठिकाणी रस्त्या शेजारी कचऱ्याचे ढीग साठत आहेत, अशा ठिकाणी ग्रामपंचायतीने कचरा टाकू नये असे आवाहन करणारे फलक लावावेत अशी मागणी महेश पाटील यांनी केली.

Advertisement

पाचगाव चे तलाठी प्रल्हाद यादव यांच्या कार्यपद्धतीबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली. प्रल्हाद यादव हे ग्रामसभेचे उपस्थित नव्हते. ग्रामसभा सुरू होऊन दीड तास झाल्यानंतर ते ग्रामसभेत आले.
मराठा आंदोलनाला ग्रामसभेने पाठिंबा देण्याचा ठराव करावा असे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी सुचवले. ग्रामसभेमध्ये भिकाजी गाडगीळ, विशाल पाटील,संभाजी शिंदे, महेश पाटील, माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी,संजय पाटील, युवराज उगळे, विवेक काटकर, यांच्यासह ग्रामस्थांनी प्रश्न विचारण्यासाठी सहभाग घेतला.

प्रश्नोत्तरावरून काही काळ सभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला.एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. काही वेळानंतर पोलीस ग्रामसभेत उपस्थित झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पूर्ण होईपर्यंत ग्रामसभा झाली .

साऊंड सिस्टम चा खेळ खंडोबा
ग्रामसभेमध्ये केवळ एकच माईक होता. यामुळे प्रश्न सांगणारे आणि उत्तर देणारे यांचे काही वेळा एकमेकाला, तसेच ग्रामस्थांना बोलणे समजत नव्हते. ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेला माइक ही अनेक वेळा मध्येच बंद पडत होता. ग्रामपंचायतीने ग्रामसभेसाठी येथून पुढे तरी किमान दोन ते तीन माईक उपलब्ध करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यावेळी पाचगाव चे उपसरपंच शांताराम पाटील, माजी सरपंच संग्राम पाटील,माजी उपसरपंच संजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोवाळकर, अमित कदम, सागर दळवी, पुनम अमोल गवळी, विकास बुरबुसे, संदीप गाडगीळ, विकास बुरगुसे, संदीप गाडगीळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.