For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पॅसेनेट क्लबचे यश

09:43 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पॅसेनेट क्लबचे यश
Advertisement

बेळगाव : कोल्हापूर येथील यशवंतराव चव्हाण दुसऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या पॅसेनेट क्लबच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. शर्मिष्ठा मालाईने 6 पदकांसह उत्कृष्ट कामगिरी करीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र येथे दुसऱ्या ऑल इंडिया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या पॅसेनेट क्लबच्या जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये शर्मिष्ठा मलाईने 4×100 मी. फ्रीस्टाईल रिलेमध्ये सुवर्ण, 200 मी. वैयक्तिक मिडलेमध्ये तिसरा क्रमांक, 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये तिसरा क्रमांक, 400 मी. फ्रीस्टाईल, 200 मी. बॅकस्ट्रोक, 50, 100 मी. बॅकस्ट्रोक या सर्व प्रकारात तिसरा क्रमांकासह कांस्यपदक पटकाविले. त्याचप्रमाणे यश पिंजोळीने 50 मी. बटरफ्लॉयमध्ये व 100 मी. बटरफ्लॉयमध्ये दुसऱ्या क्रमांकासह रौप्यपदक, नुमाण इनामदारने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक, आदर्श बांदीवडेकरने 50 मी. बटरफ्लॉयमध्ये तिसऱ्या क्रमांकासह कांस्यपदक, ओम पटूकाळेने 4×100 फ्रीस्टॉईल रिलेमध्ये तिसरा क्रमांक, शौर्य कुरणदवाडने 4×100 फ्रीस्टाईल रिलेमध्ये रौप्य पदक पटकाविले. या सर्व जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक श्याम मलाई, सुरज मंगनाकर, संदीप मलाई, वरून बल्लोळी, वीरू गवळी व मनोज जाधव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.